मध्य रेल्वेवरील अंबिवली आणि टिटवाळा रेल्वे स्थानकांमध्ये कसारा दिशेला ओव्हरहेड वायरच्या तांत्रिक बिघाडामुळे काही वेळ दोन्ही दिशांकडील लोकल सेवा दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एक ते दीड तास बंद होती. (छायाचित्र ः ऋषिकेश चौधरी)
मध्य रेल्वेवरील अंबिवली आणि टिटवाळा रेल्वे स्थानकांमध्ये कसारा दिशेला ओव्हरहेड वायरच्या तांत्रिक बिघाडामुळे काही वेळ दोन्ही दिशांकडील लोकल सेवा दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एक ते दीड तास बंद होती. (छायाचित्र ः ऋषिकेश चौधरी) 
मुंबई

ओव्हर हेड वायर तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळित

सकाळ वृत्तसेवा

टिटवाळा : मध्य रेल्वेच्या आंबिवली आणि टिटवाळा रेल्वेस्थानकांमध्ये कसारा दिशेला जाणाऱ्या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे सोमवारी (ता. 14) काही वेळ दोन्ही बाजूकडील लोकल सेवा विस्कळित झाली होती. मात्र यावेळी मेल व एक्‍स्प्रेस गाड्या बंद करून लोकल सेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.

सोमवारी दुपारी 12.04 ते 12.55 वाजण्याच्या दरम्यान आंबिवली-टिटवाळा रेल्वेस्थानकांदरम्यान कसारा दिशेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये अचानक बिघाड झाला; त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणारी वाहतूक ही काही काळ बंद झाली होती. ती अर्ध्या तासानंतर सुरू झाली.

दरम्यान, कसारा दिशेच्या गाड्याही काही वेळात सुरू होतील, असे रेल्वेचे प्रभारी एस. बी. महिबार यांनी सांगितले. यावेळी अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना होणारी अडचण लक्षात घेऊन मेल व एक्‍स्प्रेस गाड्या बंद करून लोकल सेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Sanju Samson Fined : अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

Latest Marathi News Live Update : नंदुरबार येथे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची उद्या सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT