mumbai railway  sakal
मुंबई

Mumbai News : मध्य रेल्वेचा हार्बर मार्ग कचऱ्यात

चुनाभट्टी ते सीएसटी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर प्लास्टिक कचऱ्याचा ढीग जमा झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गालगत कचऱ्याचे ढीग पडून आहेत. त्याकडे मध्य रेल्वे आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने रेल्वे प्रवाशांसह सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे, असा आरोप करीत समाजसेवक हितेंद्र गांधी यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील विशेषतः चुनाभट्टी ते सीएसटी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर प्लास्टिक कचऱ्याचा ढीग जमा झाला आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलचे तुकडे, कागदांचे तुकडे आणि लगदे यांनी रेल्वे रूळ झाकून गेले आहेत.

वारंवार तक्रार करूनदेखील हा प्लास्टिक कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथून निघणाऱ्या हानीकारक धुरामुळे प्रवाशांना श्वसन आणि त्वचा यांचे आजार होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने हा कचरा ड्रेनेजला अडथळा निर्माण करतो आहे आणि रोगांचे संभाव्य धोके वाढवत आहे. ही परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.

यासंदर्भात २५ ऑगस्टला हितेंद्र गांधी यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

यासंदर्भात मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी माहिती घेऊन तुम्हाला कळवतो, असे सांगितले.

कारवाई करण्याची मागणी

हितेंद्र गांधी यांनी चमेली देवी विरुद्ध यूपी राज्य (२००३) आणि एम. सी. मेहता विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (१९८६) सारख्या प्रकरणांचे दाखले देत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाला सर्वसमावेशक चौकशी करण्याची विनंती केली आहे. यासोबतच रेल्वे प्रवाशांचे आरोग्य आणि हक्क राखण्याच्या महत्त्वावर जोर दिला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही गांधी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: पुण्यात गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

MHADA House: म्हाडाचं घर स्वस्तात मिळणार, घरांच्या किंमती होणार कमी, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Palghar Crime: प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार, निर्जन बंगल्यात नेत कृत्य; तीन जण ताब्यात

Marathi News Live Updates : गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

SCROLL FOR NEXT