mumbai-local.jpg 
मुंबई

धक्कदायक: हागणदारी मुळं कमी झालाय, मुंबईच्या लोकलचा स्पीड 

दीनानाथ परब

मुंबई महापालिकेने चार वर्षांपूर्वी मुंबई हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात असं झालेलं नाही. त्याचा फटका मध्य रेल्वेला बसतोय. मध्य रेल्वे मार्गावरील विष्ठेमुळे रेल्वे रुळाचं आयुष्य कमी होतय. देखभाल खर्च वाढतोय. पण त्याचबरोबर अनेक लोकल्सच्या वेगावरही परिणाम होतोय. मध्य रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी लोकल्सचा वेग कमी करावा लागतोय. 

काही पट्ट्यांमध्ये ट्रेन्सचा ताशी वेग १०० किमी आहे. पण काही पट्ट्यांमध्ये ट्रेन्स ताशी ३० किमी पेक्षा जास्त वेगाने पळवता येत नाहीत. काही ठिकाणी रेल्वे रुळ गंजल्यामुळे धोकादायक बनले आहेत. हे रुळ गंजण्याचं कारण मलमूत्र आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. 

मानवी विष्ठेमुळे रेल्वे कामगारांना रुळावर काम करताना अडचणीच येतातच, पण त्याचबरोबर रुळाचे आयुष्य ५० टक्क्याने कमी होते, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

"लोकांनी रेल्वे रुळावर प्रांतविधी उरकु नयेत, यासाठी आम्ही वेगवेगळे मार्ग अवलंबत असतो. झोपडपट्टीजवळ  जे रुळ आहेत, तिथे आरपीएफचे जवान तैनात केले जातात. दंड आकारला जातो, नोटीस दिली जाते. पण अजूनही समस्या सुटलेली नाही" असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. झोपडपट्टीत राहणीमानाचा दर्जा सुधारावा, यासाठी रेल्वेचे अधिकारी महापालिकेच्या संपर्कात असतात. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT