central railway Long distance journeys safe smoke detectors in 204 Mail-Express sakal
मुंबई

Mumbai News : लांब पल्याच्या प्रवास आणखी सुरक्षित; २०४ मेल-एक्सप्रेसमध्ये लागले स्मोक डिटेक्टर!

२४ एसी कोचमध्ये स्मोक डिटेक्टर लागले असून उर्वरित एसी कोचमध्ये डिटेक्टर लावण्याचे काम सुरु

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये स्मोक डिटेक्टर,फायर अलार्मसारख्या अग्निशमन यंत्रणा लावण्याची शिफारस रेल्वे सुरक्षा आयोगाने २०२१-२२ च्या अहवालात केल्यानंतर मध्य रेल्वेने आपल्या मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्यातील रेल्वे डब्यात स्मोक डिटेक्टर लावण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता लांबपल्याचा मेल-एक्सप्रेस गाड्याचा प्रवास आणखी सुरक्षित झाला आहेत.

भारतीय रेल्वेच्या दररोजच्या अडीच कोटी प्रवाशांसी रेल्वेतून प्रवास करतायत, रेल्वे प्रवासात धूम्रपान करण्याची सक्त मनाई असताना. काही प्रवासी निष्काळजीपणा बिडी-सिगारेट पितात.त्यामुळे रेल्वे गाड्यात आगीचा घटना घडतात.

या घटनेला आळा घालण्यासाठी आणि धूम्रपान करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने आपल्या मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्यात स्मोक डिटेक्टर लावण्यात येत आहे. मध्य रेल्वेने लांब पल्याच्या २०४ मेल-एक्सप्रेसमधील साध्या कोचमध्ये (नॉन-एसी ) स्मोक डिटेक्टर लावले आहे. याशिवाय २४ एसी कोचमध्ये स्मोक डिटेक्टर लागले असून उर्वरित एसी कोचमध्ये डिटेक्टर लावण्याचे काम सुरु आहे.

तसेच एलएचबी आणि आयसीएफ पँट्री कार असलेल्या गाड्यांमध्ये देखील स्मोक डिटेक्टर लागला असून दोन गाड्यामध्ये डिटेक्टर लावण्याचे काम सुरु असून ते ऑगस्टपर्यंत पुर्ण होणार आहे. याशिवाय १३७ पॉवरकारमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेचा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला दिली आहेत.

लवकरच लोकलमध्ये स्मोक डिटेक्टर्स

मुंबई उपनगरीय लोकल गाड्यात स्मोक डिटेक्टर्स, अॅटोमॅटीक फायर सुपर सेशन सिस्टिम नाही. मध्य रेल्वेच्या ईएमयू आणि मेमू गाड्यांसाठी ६४६ बेसिक युनिट्समध्ये स्मोक डिटेक्टर्स आणि फायर अलार्म सिस्टिम लावण्यासाठी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात यासाठी तशी तरतूद केली आहे. सध्या अग्निशमन यंत्रणा केवळ लोकल ट्रेनच्या मोटरमन आणि गार्डच्या केबिनमध्येच उपलब्ध आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलमध्ये लवकरच स्मोक डिटेक्टर्स लावण्याचे काम रेल्वेकडून हात घेण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

India Cricket Team: अजित आगरकर, गौतम गंभीरचा 'सिक्रेट प्लान'! रोहित शर्मा, विराट कोहली लवकरच होणार माजी खेळाडू

Crime: पैसे परत कर नाहीतर...; प्रेयसीची धमकी, ५० वर्षीय प्रियकर संतापला, रागाच्या भरात २ मुलांसह महिलेसोबत धक्कादायक कृत्य

सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

IND vs PAK : भारताच्या 'पोरींना' दिला त्रास, ICC ने उतरवला माज! पाकिस्तानच्या खेळाडूवर कारवाई

SCROLL FOR NEXT