मुंबई

मध्य रेल्वेकडून CSMT ते कल्याण एसी लोकलला हिरवा कंदील

प्रशांत कांबळे

मुंबईः  रेल्वे मंत्रालयाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण दरम्यान एसी लोकल चालवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आता मध्य रेल्वेच्या मेन मार्गावरील प्रवाशांना सुद्धा एसी लोकलचा प्रवास करता येणार आहे. यामध्ये सीएसएमटी ते कल्याण दरम्यान 10 सेवा धावणार असल्याचे समजते आहे.

मध्य रेल्वेने 30 जानेवारी 2020 पासून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली एसी लोकल सुरू केली होती. तर मेन लाईन आणि हार्बर रेल्वे मार्गावर त्यावेळी एसी लोकल चालवण्याचा विचार करण्यात आला नव्हता. एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळणार नाही किंवा इतर लोकल फेऱ्या खंडित होण्याची भीती मध्य रेल्वेला होती.

मात्र, मध्य रेल्वेने अखेर मेन लाईनवर आता एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दोन फेऱ्या सकाळी असून, इतर फेऱ्या गर्दीच्या वेळेत चालवण्यासाठी मध्य रेल्वे विचाराधीन असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले असून, हार्बर रेल्वे मार्गावर सुद्धा एसी लोकल सुरू करण्याच्या मध्य रेल्वे विचाराधीन असल्याचे सांगितल्या जात आहे.

----------------------

(संपादन- पूजा विचारे)

central railway run ac local service between csmt and kalyan

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB Live Score : विराटचं शतक हुकलं मात्र आरसीबीनं उभारल्या 241 धावा

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

Pune Fraud News : आयटी अभियंता तरुणीच्या नावावर परस्पर उचलले ४५ लाखांचे कर्ज; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai News : मानखुर्द येथील विषबाधा प्रकणी अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; गर्जना संघटनेची मागणी

SCROLL FOR NEXT