central railway mega block  sakal
मुंबई

Mega Block : मध्य रेल्वेवर शनिवारी- रविवारी मेगाब्लॉक!

तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मुख्य मार्गावर आज शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मुख्य मार्गावर आज शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेणार आहे. तर रविवारी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे -

  • कुठे- भायखळा ते माटुंगा अप- डाऊन जलद मार्गावर

  • कधी- शनिवारी मध्य रात्री १२.३५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथे येणार्‍या अप मेल / एक्स्प्रेस माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर एक्स्प्रेसला दोनदा थांबा दिला जाईल. डाऊन मेल / एक्स्प्रेस भायखळा ते माटुंगा दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या एक्स्प्रेसला दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दोनदा थांबा देण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावर -

  • कुठे- कुर्ला ते वाशी अप- डाऊन हार्बर मार्गावर

  • कधी- रविवार सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर आणि बेलापूर ते सीएसएमटी लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक काळात प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल धावतील. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान लोकल सुर राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT