मध्य रेल्वे sakal
मुंबई

Central Railway : आठवड्याच्या पहिल्याच पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प

३५० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द, तर शेकडो लोकल सेवा विलंबाने !

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सोमवारी पहाटेपासून सुरु असेल्या पावसामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना चांगलेच झोडपून काढले. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली होती. सीएसएमटी-पनवेल लोकल सेवा तब्बल तीन तास ठप्प होती. तर, मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा तासभर ठप्प होती. त्यामुळे दिवसभर अंदाजित साडे तीनशेपेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आली. तसेच लांब पल्ल्याच्या मेल- एक्सप्रेस रेल्वे गाड्या पावसामुळे रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे आठवड्याचा पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे अतोनात हाल झाले.

रविवारी रात्री पासुन सुरु झालेल्या पावसाने सोमवारी पहाटेपासून मुंबई आणि उपनगरत जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे सखग भागातील सायन,कुर्ला,चुनाभट्टी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. विद्याविहार,कुर्ला,सायन,भांडूप आणि नाहूर स्थानकांत रेल्वे रुळांवर ४ इंचापर्यत पाणी आल्याने पहाटे ५ वाजून १५ मिनिटांपासूनच ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात आली. यामुळे लोकल सेवा आणि मुंबई येणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाडयांना एका मागे एक खोळंबल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवासी रेल्वे रुळावरून चालत जात नजीकचे स्थानक गाठत असल्याचे चित्र दिसून आले. सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सीएसएमटी ते ठाणे रेल्वे मार्गिका सुरु करण्यात आली. तब्बल तासभर मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प असल्याने लोकल सेवांचे बंचिंग झाले. त्यातही पावसाच्या सरी कोसळत असल्याने गाड्यांचाही वेग मंदावला होता. यामुळे रेल्वे स्थानकांत प्रवाशांची तुफान गर्दी उसळली होती.

हार्बर मार्ग तीन तास ठप्प

हार्बर मार्गावरील चुनाभट्टी, वडाळा स्थानकात देखील रुळांवर पाणी आल्याने सीएसएमटी ते वाशी दरम्यानची लोकल सेवा खोळंबली होती. सोमवारी सकाळी १०. ३० वाजता चुनाभट्टी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते वाशी आणि सीएसएमटी ते बेलापूरची लोकल सेवा बंद करण्यात आली. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी मानखुर्द ते पनवेल आणि वाशी दरम्यान लोकल चालविण्यात येत होत्या. तसेच वडाळा ते सीएसएमटी लोकल चालविण्यात आल्या होत्या. दुपारी १.३० वाजत सीएसएमटी ते पनवेल लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र, तब्बल तीन तास पनवेल ते सीएसएमटी थेट लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.

पश्चिम रेल्वे विलंबाने

दिवसभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे हवेतील दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा धीम्या गतीने धावत होत्या. विशेष म्हणजे,पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सुद्धा प्रचंड हाल झाले आहे.

मेल- एक्सप्रेस गाड्या रद्द

मुसळधार पावसामुळे लांब पल्ल्याच्या काही मेल- एक्सप्रेस गाड्याही रद्द तर काही दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आलेल्या आहे. ट्रेन क्रमांक १२१२८ पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११००८ पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस,ट्रेन क्रमांक ११००७ सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२१२७ सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११०१० सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२१२३ सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस,ट्रेन क्रमांक १२१०९ सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२१२४ पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन आणि ट्रेन क्रमांक ११००९ सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहे. तर अनेक मेल- एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT