मुंबई

बोनसची घोषणा न झाल्यास "चक्का जाम'; रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मंगळवारी देशभरात विरोध प्रदर्शन 

प्रशांत कांबळे

मुंबई ः ऑल इंडिया रेल्वेमन फेडरेशनच्या (एआयआरएफ) बैठकीत बोनसची मागणी करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने 21 ऑक्‍टोबरपर्यंत बोनसची घोषणा न केल्यास 22 ऑक्‍टोबरला "चक्का जाम' करण्याचा इशारा एआयआरएफचे महामंत्री शिवगोपाल मिश्रा यांनी दिला आहे. तसेच मंगळवारी देशभरात बोनस दिवस साजरा करून विरोध प्रदर्शन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

बोनस, खासगीकरण, जुनी पेंशन योजना, डीए, रात्रपाळी भत्ता अशा विविध मागण्यांवर एआयआरएफच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीतील सर्व मागण्यासंदर्भात रेल्वेमंत्री, रेल्वे मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह, सचिवांशीदेखील चर्चा करण्यात आली. मागण्या मान्य करण्यात येत असल्या, तरी अद्याप त्यासंबंधी घोषणा होत नसल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने सणासुदीच्या काळात बोनस मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी दुर्गापूजेपूर्वीच रेल्वेच्या बोनसची घोषणा केली जात होती; मात्र अद्याप बोनसची घोषणा झाली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे 20 ऑक्‍टोबरला बोनस दिवस साजरा करून रेल्वे कामगार युनियनच्या वतीने देशभरात विरोध प्रदर्शन करण्यात येणार आहे, असेही मिश्रा यांनी सांगितले. 

---------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT