१६ फेब्रुवारीला कामोठ्यात ‘चला हवा द्या’ 
मुंबई

१६ फेब्रुवारीला कामोठ्यात ‘चला हवा द्या’

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : दिवंगत बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व झेंडा सामाजिक संस्थेतर्फे कामोठेकरांसाठी १६ फेब्रुवारीला ‘चला हवा आली कामोठ्यात’ या खास धमाल विनोदाच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या तिकिटांच्या माध्यमातून गोळा होणारा नफा गोरगरिबांच्या मुलांना आश्रय देणाऱ्या पनवेल तालुक्‍यातील नेरे येथील सील आश्रमाला देणगी स्वरूपात दिला जाणार आहे. या कार्यक्रमाचे ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आहे. 

मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर आता पहिल्यांदाच ‘चला हवा येऊ द्या’चे कलाकार नवी मुंबईतील कामोठे शहरात येणार आहेत. प्रसिद्ध विनोदी कलाकार भाऊ कदम, डॉ. नीलेश साबळे, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भरत गणेशपुरे आणि अभिनेत्री श्रेया बुगडे आदी विनोदी कलाकार ‘चला हवा आली कामोठ्यात’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आत्तापर्यंत फक्त दूरचित्रवाणीवर पाहिलेल्या या कलाकारांना प्रत्यक्ष विनोद करताना पाहण्याची संधी या कार्यक्रमातून उपलब्ध होणार आहे. या हास्य आणि धमाल उडवून देणाऱ्या या कार्यक्रमासोबतच प्रक्षेकांना ‘सारेगम’विजेता अभिजित कोसंबी, चिमणी उडाली फेम कविता राम यांच्या सुरेल आवाजात गीतांचा खास नजराणा लाभणार आहे. तसेच प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश भास्कर सरवणकर यांनी दिग्दर्शन केलेले नृत्याविष्कार पाहण्यास मिळणार आहेत. झेंडा सामाजिक संस्था व दिवंगत बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय या संस्थांमार्फत दर वर्षी कामोठे शहरात विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमातून समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जातात. 

ही बातमी वाचली का? जामीन घेताना कागदपत्रांची सत्यता तपासा

या ठिकाणी होणार कार्यक्रम
१६ फेब्रुवारीला रविवारी संध्याकाळी ६ ते १० या वेळेत खांदा कॉलनी सिग्नल शेजारी, सर्कस ग्राऊंडवर हा भव्य कार्यक्रम होणार आहे. खांदेश्‍वर व मानसरोवर रेल्वेस्थानकांबाहेर यासाठीचे तिकीट उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT