Chalo-Jeete-Hain-
Chalo-Jeete-Hain- 
मुंबई

पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित 'चलो जीते है' शॉर्ट फिल्म

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर तयार करण्यात आलेल्या शॉर्ट फिल्मचा विशेष शो शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या विशेष शोसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले होते. सचिन तेंडुलकर, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री कंगना राणावत यांच्यासह इतर अनेक सेलेब्रिटीज यावेळी उपस्थित होते. 

'चलो जीते है' ही शॉर्ट फिल्म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर बनवण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर युट्यूबवर रिलीज करण्यात आला होता. मंगेश हडवळे यांनी ही फिल्म दिग्दर्शित केली आहे. आज फिल्म प्रदर्शित होत आहे. त्यापूर्वी निमंत्रितांसाठी काल विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या सिनेमाचे कौतुक केले आहे. 'दुसऱ्यांसाठी जगणे, हेच खरे जीवन आहे. आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या बालपणावर आधारित 'चलो जीते है' या लघुपटाच्या माध्यमातून अतिशय सुरेख आणि प्रेरणादायी संदेश देण्यात आला आहे. स्वत:साठी नव्हे, तर इतरांसाठी जगणे ही आपली समृद्ध संस्कृती आहे. आपल्या जीवनातील आणि कुटुंबातील सर्व प्रतिकूलतेवर मात करुन स्वतःचे जीवन जगत असताना इतरांची दुःख नुसती ओळखायचीच नाही, तर त्यावर या बालवयात समाधान शोधायचे. मला खात्री आहे की हा लघुपट अनेकांना प्रेरणा देईल', असे त्यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहे. तसेच सिनेमाच्या टीमचे अभिनंदनही केले आहे.

पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी सर्वाधिक पात्र : अभिनेत्री कंगना राणावत
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अभिनेत्री कंगनाने मोदींचे भरभरुन कौतुक केले. 2019 च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील अशी आशा व्यक्त केली आहे. प्रचंड मेहनतीनंतर ते या पदापर्यंत पोचले आहेत त्यामुळे पंतप्रधान म्हणुन मोदींच्या योग्यतेवर शंका घेण्यात येऊ नये असेही ती म्हणाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT