मुंबई

आजपासून कोकणात मुसळधार पावसाची शक्‍यता; मुंबईतही मेघगर्जनेसह बरसणार 

समीर सुर्वे

मुंबई : तेलंगणामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रातून अरबी समुद्रात गेल्यानंतर आता बंगलच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवार (ता. 19) पासून मुंबई वगळता कोकणात मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता आहे. मुंबईत मात्र मंगळवारी (ता. 20) आणि बुधवारी (ता. 21) गडगडाटासह पाऊस पडेल. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. 

बंगालच्या उपसागरात ऑक्‍टोबरच्या सुरुवातीला तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तेलंगणामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. ते मध्य महाराष्ट्र, कोकण असा प्रवास करत अरबी समुद्रात गेले असून सध्या ते ओमानच्या दिशेने जात आहे. या काळात झालेल्या तुफान पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले आहे. त्यानंतर आता पुन्हा उपसागरात नव्याने कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे सोमवारपासून पुन्हा कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सोमवारपासून गुरुवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता आहे. 

मुंबईत आज कुलाबा येथे कमाल 33 आणि किमान 26 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सांताक्रूझ येथे कमाल 33 आणि किमान 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस तापमान याच पातळीवर राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. 
-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: 'श्रेयस अय्यर -गंभीरला काढून टाकण्यापेक्षा जरा विचार करा आणि IPL... ', संजय मांजरेकरांची BCCI वर सडकून टीका

Ishwarpur Municipality Politics : गाफील जयंतराव युतीच्या खिंडीत अडकले; जयंत पाटील यांचा 'आनंद' अल्पजीवी ठरला, मुरब्बी राजकारणी कसा राहिला गाफील?

Beed: एटीएमचा स्लॅब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

Kolhapur Police Raid : मुंबई-पुण्यातून आणल्या जायच्या महिला; व्हॉट्सॲप ग्रुप करून वाशीतील लॉजमध्ये सुरू होता वेश्‍याव्यवसाय, हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश

Smartphone Survey: स्क्रीन फुटली,फोन बदलला! ५३% भारतीयांनी खरेदी केला नवीन फोन!

SCROLL FOR NEXT