Letter Write sakal
मुंबई

Mumbai News : अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहीत राहायचे का? चौथीतील मुलीने केला मुख्यमंत्र्यांना सवाल

चंद्रपूर जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक शाळा, गोंडगुडा (धोंडाअर्जूनी) या शाळेत इयत्ता चौथी शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना सवाल उपस्थित केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - 'माझी शाळा सुंदर शाळा' या उपक्रमाच्या अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना आवाहन करण्यासाठी पाठवलेल्या पत्रावर आम्ही सगळे अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहायचे का? असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांना केला आहे.  तिच्या या धाडसावर राज्यातील शिक्षक पालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर या पत्राचे अनेक ठिकाणी स्वागत होत असून एका मुलीने दाखवलेल्या धाडसाचे कौतुकही केले जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक शाळा, गोंडगुडा (धोंडाअर्जूनी) या शाळेत इयत्ता चौथी शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना हा सवाल उपस्थित केला आहे.

ती आपल्या पत्रात म्हणते, माननीय मुख्यमंत्री तुम्ही दिलेले पाठ्यपुस्तक मला आवडले नाही. कारण एका विषयासाठी चार-चार पुस्तके शोधावे लागतात. यापेक्षा आमचे जुने पुस्तक छान होते. कारण सगळं गणित एका पुस्तकात सगळे इंग्रजी-इंग्रजी एका पुस्तकात सगळ्या विज्ञान एका पुस्तकात होते. त्यामुळे एकाच विषयाचे पुस्तक वाचायला मजा यायची.

आणि सगळ अभ्यास सोडून तुम्हाला पत्र लिहीत राहायचे का, तुम्ही जिंदा आहेत का, असा मार्मिक सवाल देखील या मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

राज्यातील शाळांमध्ये 'माझी शाळा सुंदर शाळा' या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावर विद्यार्थ्यांना या संदर्भात प्रतिक्रिया देऊन पत्र लिहून घेणे, त्यासोबतच सेल्फी करून ती पाठवणे, तसेच स्वच्छता मॉनिटर आदी उपक्रम राबवले जात आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर विविध सर्व विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्र्याच्या पत्रासंदर्भात हे पत्र आवडले का, या विषयावर या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पत्र लिहून घेण्यात येत आहेत. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने सगळ अभ्यास सोडून तुम्हाला पत्र लिहीत राहायचे का? असा सवाल केल्याने यावर शिक्षण तज्ज्ञांनी सरकारने यावर विचार करण्याची गरज व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT