chandrashekhar Bawankule when political leaders came to Dombivli hawkers move away Sakal
मुंबई

Mumbai News : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे डोंबिवलीत येताच फेरीवाले हटले

शहरात मंत्री येताच फेरीवाले हटतात अन्यथा नाही

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाल्यांनी कायम गजबजलेला असतो. फेरीवाल्यांविरोधात आंदोलन, मोर्चे होऊन देखील फेरीवाले हटविण्यात प्रशासन असमर्थ ठरले आहे.

मात्र शहरात मंत्री येताच स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त होतो नंतर पुन्हा गजबजतो. याचाच प्रत्यय डोंबिवली करांनी रविवारी पुन्हा घेतला. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारी डोंबिवली आले. ते येणार असल्याने सकाळ पासून स्टेशन परिसरातील फेरीवाले हटलेले दिसले.

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रविवारी डोंबिवलीत महाविजय 2024 संकल्प अभियान आणि अमृत कलश यात्रेनिमित्त रविवारी सकाळी डोंबिवलीत आले आहेत. मानपाडा रस्त्यावरील शिवाजी पुतळा ते गणेश मंदिर दरम्यान ते अमृत कलश यात्रेत सहभागी होणार आहेत.

फेरीवाल्यांचे अडथळे अमृत कलश यात्रेत येऊ नयेत म्हणून रविवारी पहाटे पासून फ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी मानपाडा रस्ता शिवाजी पुतळा ते फडके रस्ता, गणेश मंदिर रस्त्यांवरील फेरीवाल्यांच्या टपऱ्या, ठेले, कायमची बस्ताने हटविली. या रस्त्याच्या पदपथांच्या आधार दगडांवर सफेद पट्टे मारून फडके रस्ता देखणा करण्यात आला आहे.

फडके रस्ता, चिमणी गल्ली, नेहरू रस्ता, बाजीप्रभू चौक भागातील फेरीवाले कायमचे हटवा म्हणून नागरिक दररोज पालिका आयुक्त, उपायुक्त, फ प्रभाग अधिकाऱ्यांकडे तक्रारी करतात. त्याची दखल घेतली जात नाही. मात्र भाजपचा एक नेता येणार म्हणून पालिकेने फेरीवाल्यांना रविवारी अर्धा दिवसासाठी फडके रस्ता फेरीवालामुक्त केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

फडके रस्ता मोकळा आणि फेरीवाला मुक्त राहण्यासाठी भाजपच्या प्रत्येक नेत्याने आणि मंत्र्याने दररोज फडके रस्ता भागात यावे. किमान नागरिकांना या भागातून चालण्यास प्रशस्त रस्ता मोकळा उपलब्ध होईल आणि फेरीवाले या भागातून कायमचे हद्दपार होतील, अशी मागणी नागरिक करत आहेत.

रविपारी सकाळी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना फडके रस्त्यावरील शुकशुकाट पाहून धक्काच बसला. अनेक वर्षानंतर फडके रस्ता प्रथमच मोकळा, चालण्यास सुटसुटीत, प्रशस्त वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT