Newali Road Way sakal media
मुंबई

डोंबिवली : जलवाहिनीच्या कामासाठी नेवाळी नाक्यावरील वाहतूक मार्गात बदल

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) वतीने पाणी पुरवठा योजनेंतर्गत (water supply scheme) जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी (water pipeline work) नेवाळी नाका मार्गावरील जड अवजड वाहनांच्या वाहतुकीत वाहतूक पोलिसांकडून (traffic police) बदल करण्यात आले आहेत. या कामासाठी महिनाभराचा कालावधी लागणार असल्याने पूर्ण एप्रिल महिनाभर वाहतुकीत बदल (changes in traveling way) राहणार असून याची वाहनचालकांनी दखल घ्यावी असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

एमआयडीसीच्या वतीने जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. नेवाळी नाका येथे हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. अंबरनाथ, बदलापूर, कल्याण ग्रामीण, कल्याण शहर परिसरातून ठाणे, नवी मुंबई दिशेला होणारी वाहतूक ही नेवाळी नाका येथून होते त्यामुळे हा नाका वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. नेवाळी नाका येथे हे जलवाहिनीचे काम हाती घ्यावयाचे असल्याने तत्पूर्वी येथील वाहतूकीत बदल होणे गरजेचे असल्याने हे बदल वाहतूक पोलिसांनी केले आहेत. नेवाळी नाका ते कल्याण रस्त्यावरील पोलीस चौकी समोरील मुख्य रस्ता खोदण्यात येणार आहे.

त्यामुळे या मार्गावरील जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांच्या माहितीसाठी ठाणे जिल्हा प्रशासन वाहतूक विभागाने ट्विट करत देखील याची माहिती प्रवाशांना देऊ केली आहे. 29 मार्चपासून हे बदल लागू करण्यात आले असून सध्या अवजड वाहनांना येथून बंदी करण्यात आली आहे. महिनाभर हे काम सुरु राहणार असल्याने पुढील महिनाभर नेवाळी नाका परिसरातील वाहतूकीमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहे.

- कल्याणहून नेवाळी नाका मार्गे नवी मुंबई शहराकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना चक्की नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत असून ही वाहने टाटा नाका, मानपाडा पोलीस ठाणे, काटई नाका येथून तळोजा, नवी मुंबई मार्गे इच्छित स्थळी जातील.

- बदलापूर व अंबरनाथ कडून नेवाळी नाका मार्गे कल्याण / भिवंडी कडे जाणाऱ्या जड - अवजड वाहनांना नेवाळी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने ही साईबाबा मंदिर, फॉरवर्ड लाईन, नेहरू चौक, वालधुनी मार्गे इच्छित स्थळी जातील.

- तळोजा नवी मुंबई कडून नेवाळी नाका मार्गे कल्याण शहराकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नेवाळी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने खोणी फाटा येथून डावीकडे वळण घेऊन काटई नाका मार्गे कल्याण भिवंडी शहराकडे इच्छित स्थळी जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT