Changes in traffic Shilphata route girder will set Desai Khadi bridge mumbai sakal
मुंबई

Mumbai News : शिळफाटा मार्गावरील वाहतूकीत बदल; देसाई खाडी पुलावर गर्डर टाकण्यात येणार

पलावा जंक्शन जवळील देसाई खाडी पूलावर एमएसआरडीसी च्या वतीने नविन पूल उभारणीचे काम सुरु

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - पलावा जंक्शन जवळील देसाई खाडीवर नविन पूल उभारणीचे काम सुरु आहे. या पुलाचे गर्डर टाकण्यात येणार असल्याने कल्याण शीळ मार्गावरील वाहतूकीत बुधवार पासून बदल करण्यात आले आहेत.

या कामानिमित्त सहा दिवसांसाठी देसाई खाडी पूलावरुन वाहनांना रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत बंदी घालण्यात आली आहे. पूलावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

पलावा जंक्शन जवळील देसाई खाडी पूलावर एमएसआरडीसी च्या वतीने नविन पूल उभारणीचे काम सुरु आहे. यापूर्वी पूलाचे काही गर्डर टाकण्यात आले आहेत. उर्वरीत गर्डर टाकण्याचे काम येत्या बुधवारी हाती घेण्यात येणार आहे.

9 ते 14 ऑगस्ट या कालावधीत रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत हे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्याचे नियोजन वाहतूक विभागाने केले आहे. एमएसआरडीसीने गर्डरच्या कामासाठी देसाई खाडी पूल ते पलावा चौक दरम्यान वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आल्याची माहिती कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र क्षीरसागर यांनी दिली.

देसाई खाडी पूल ते पलावा जंक्शन या मार्गाला पर्यायी मोठे असे पोहोच रस्ते नाहीत. यामुळे सहा दिवसांच्या कालावधीत रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांना पूलावर प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

ही वाहने कल्याण फाटा कडून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याण फाटा येथे बंदी घालत ही वाहने मुंब्रा बायपास - खारेगाव टोल नाका मार्गे इच्छित स्थळी जातील. तर कल्याण हून कल्याण फाटा कडे जाणारी सर्व वाहने खोणी नाका, तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जातील असे सांगण्यात आले आहे.

रात्रीच्या वेळेत हलक्या वाहनांचे प्रमाण कमी असते. नोकरदार वर्गाच्या वाहनांची वर्दळ रात्री नऊ वाजेपर्यंत रस्त्यावर असते. त्यामुळे सहा दिवसांच्या कालावधीत शिळफाटा रस्त्यावर रात्रीच्या वेळेत पलावा चौकातील कामासाठी रस्ते बंदचा निर्णय घेतला तरी वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होणार नाही. तरीही रात्रीच्या वेळेत सहा दिवसांच्या कालावाधीत वाहतूक पोलीस शिळफाटा रस्त्यावरील सर्व वळण रस्त्यांवर तैनात असतील असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT