मुंबई

रस्ते खोदकामासाठी कल्याणमधील वाहतुकीत बदल

रवींद्र खरात

कल्याण : कल्याण पूर्व वाहतूक शाखेअंतर्गत येणाऱ्या 'एफ केबीन'जवळील स्वर्गीय आनंद दिघे पूल ते डॉ. आंबेडकर चौक वालधुनीदरम्यान 380 मीटर सिमेंट रस्त्याच्या कामासाठी उद्यापासून (मंगळवार) खोदकामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे कल्याण शहरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

वालधुनी चौक ते एफ केबिनजवळील स्व. आनंद दिघे पूल या रस्त्यावर वाहतूक कोंडीच्या तक्रारी लक्षात घेऊन रस्त्याचे कॉंक्रीटीकरण व गटारांचे बंदीकरण कामाला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे.

या कामादरम्यान वाहतूक कोंडीची शक्‍यता लक्षात घेऊन कल्याण पश्‍चिमेकडून कोळसेवाडी व विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना स्मशानभूमीजवळील स्व. आनंद दिघे पूल व सम्राट चौक येथे जड अवजड तसेच मध्यम व हलक्‍या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सदरची वाहने सम्राट चौक, सुभाष चौक, वालधुनी, शांतीनगर कमान उजवीकडे वळून अँब्रोशिया हॉटेल, पवई चौक, श्रीराम चौक, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनमार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील. 

कल्याण पूर्वेकडून आनंद दिघे पूलमार्गे कल्याण पश्‍चिमेकडे जाणाऱ्या जड, अवजड, मध्यम, हलक्‍या, वाहनांना दिघे पूलजवळील स्मशानभूमी चौक येथे प्रवेश बंद करण्यात आली आहे. ही वाहने विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनमार्गे अँब्रोशिया हॉटेल- शांतीनगर कमान डावीकडे वळण घेऊन वालधुनी, सुभाष चौक, सम्राट चौकमार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील.

पोलिसांनी वाहतूक बदलाबाबत अधिसूचना जारी केली असून रस्त्याचे काम संपेपर्यंत हे बदल राहणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक विभाग पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी केले आहे. 

---------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, २०० रुपयांनी झाले स्वस्त

Tamhini Ghat: ताम्हिणी घाट अद्याप वाहतुकीसाठी बंद; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

India Monsoon Forecast : विदर्भ-मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे जुलै तर तरला, पण पुढील 2 महिने कसा राहील मॉन्सून? पाहा काय सांगतो IMD रिपोर्ट

India Medal Tally in CWG 2026: 'Gen Z' ची हवा! ज्युदोत ३ ऐतिहासिक पदकं अन् नीरजचे रौप्य... तालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?

PM Narendra Modi: "माझ्या आईचाही अपमान झाला... पण मी तुम्हाला माफ करतो"; जंतर मंतर प्रकरणावर PM मोदींचा भावनिक इन्स्टा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT