मुंबई

पावला-पावलावर पोलिस तरीही चोराने लढवली शक्कल, सोनसाखळी चोरीसाठी चक्क वापरली...

अनिश पाटील

मुंबई : शहरात सीसीटीव्हीचे जाळे पसरल्यामुळे दुचाकी चोरांचा चो-यांना आळा घालण्यात मुंबई पोलिसांना गेल्या काही वर्षात मोठे यश आले आहे. पण सोनसाखळी चोरांच्या एका टोळीने यावर शक्कल लढवली होती. सीसीटीव्हीपासून वाचण्यासाठी ते रिक्षाचा वापर करत होते. नुकतीच ओशिवरामध्ये या टोळक्याने रस्त्यावरून जात असलेल्या एका महिलेचे दागिने रिक्षातून हिसकावले. ओशिवरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याचा माग काढत तिघांना अटक केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबईत लाॅकडाऊनमुळे पावला पावलावर पोलिस तैनात होते. मात्र लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर मुंबईत आता पून्हा सोनसाखळी चोरांनी डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. असाच एक प्रकार अंधेरीतील ओशिवरा परिसरात उघडकीस आला आहे. मात्र यंदा सोनसाखळी चोरांनी चोरी करताना त्यांचा पॅटर्न बदलल्याचे पहायला मिळाले. ऐरवी दुचाकीहून चोरी करणाऱ्या चोरांनी या गुन्ह्यात चक्क रिक्षाचा वापर केला आहे. विशेष म्हणजे या चोरीत एका महिलेचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

ओशिवरा परिसरात एक महिला रस्त्यावरून जात असताना लक्ष्मण माणिकप्पा पुजारी, राजू राघुनंद दास, लता काळे या तिघांनी मिळून रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेची सोनसाखळी खेचून पळ काढला. या प्रकरणी महिलेने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. मागील अनेक दिवसांपासून हे प्रकार सुरू झाल्याने ओशिवरा पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पवार, पोलिस उपनिरीक्षक तुषार सावंत आणि सांताक्रूझ पोलिस ठाण्याचे शिवाजी शिंदे यांनी मोठ्या शिताफीने सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपींच्या रिक्षाचा नंबर मिळवला. या रिक्षाचा माग काढत पोलिस अखेर आरोपींपर्यंत पोहचले. पोलिसांनी लक्ष्मण माणिकप्पा पुजारी, राजू राघुनंद दास, लता काळे या तिघांवर कलम 392,34 भा.द.वी गुन्ह्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.

पोलिसांनी या आरोपींकडून चोरीची सोनसाखळी आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे.  तपासात दुचाकीहून चोरी करतान चोरांचा बॅलन्स जायचा. तसंच, सीसीटिव्हीतही त्यांचा चेहरा स्पष्ट दिसायचा. त्यामुळे आरोपीचा माग काढणं पोलिसांना सोपं जात होते. मात्र, आरोपींनी आता स्वतःची ओळख लपवण्यासाठी चोरी करण्यासाठी कधी कधी चोरीच्या रिक्षांचा आधार घेत असल्याचे अनेक गुन्ह्यातून पुढे येत आहे. या प्रकरणी पोलिस आणखी आरोपीचा शोध घेत आहेत.

( संकलन - सुमित बागुल ) 

chanin snacker used auto rickshaw to avoid cctv read full report

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Reservation : बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षणासाठी अन्नत्याग उपोषण; भिलदरीत तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली

Cancer Prevention Tips: कॅन्सरपासून वाचण्यासाठी रोजच्या दिनचर्येत समाविष्ट करा हे ८ सोपे उपाय!

Latest Marathi News Updates Live : गरियाबंदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू

IND vs UAE : कुलदीप यादव नव्हे, तर 'हा' खेळाडू ठरला इम्पॅक्ट प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा मानकरी; ड्रेसिंग रूममधील Video

Pune Crime : अपघाताचा बनाव रचून मोबाईल लुटणाऱ्या टोळीला सहकारनगर पोलिसांनी पकडले

SCROLL FOR NEXT