अलिबाग : नेहुली येथील जिल्‍हा क्रीडा संकुलाची दुरवस्‍था झाली आहे. त्‍यामुळे क्रीडापटूंमध्‍ये नाराजी आहे. 
मुंबई

क्रीडा विभागाची जबाबदारी प्रभारींकडे

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग ः एका बाजूला क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देत युवकांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्ह्यात १३ पदांपैकी केवळ दोनच पदे भरण्यात आली आहेत. त्यातही जिल्हा क्रीडा अधिकारीपदाची जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यावर सोपविण्यात आल्याने रायगड जिल्हा क्रीडा क्षेत्रात अधोगतीच्या मार्गावर चालला आहे.

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसह मंजूर १३ पदांपैकी ८ पदे रिक्त आहेत. भरलेल्या चार पदांमध्ये दोन प्रशिक्षक आहेत. यामुळे जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्राचा कारभार केवळ दोन अधिकारांच्याच खांद्यावर आहे. गेल्या चार वर्षांत रिक्त पदे भरण्यात न आल्याने रायगड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे.

क्रीडा क्षेत्राची पूर्णवेळ जबाबदारी असणाऱ्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर या पदाची जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, कॅरम, हॉलीबॉल यांसारख्या क्रीडा प्रकारांच्या संघटनांमध्ये नाराजी आहे. मदतीला कर्मचारी नसल्याने क्रीडा विभागाने या वर्षी एकाही  स्पर्धेचे आयोजन अद्याप केलेले नाही. स्पर्धा आयोजनाबरोबरच रायगड जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांचे काम अपूर्ण आहे.

संकुलाची दुरवस्था 
प्रत्येक तालुक्‍यात सरकारी क्रीडा संकुल असावे, असे राज्य सरकारचे क्रीडा धोरण आहे; परंतु रायगड जिल्ह्यात पेण, पनवेल, सुधागड, रोहा, माणगाव आणि तळा या सहा तालुक्‍यांमध्येच क्रीडा संकुले आहेत. इतर तालुक्‍यांतील क्रीडा संकुलांसाठी पाठपुरावा करण्यासाठी अधिकारीच नसल्याने कामे रखडली आहेत. अलिबाग येथील जिल्हा क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. जलतरण तलावाची निगा राखण्यासाठी कोणीही नसल्याने ते बंद आहे. धावपट्टीवरही मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे क्रीडापटूंमध्ये नाराजी आहे. 

जिल्हा क्रीडा अधिकारीपदाचा प्रभारी पदभार आणि अन्य दोन तालुक्‍यांच्या तालुका क्रीडा अधिकारीपदाची जबाबदारी माझ्याकडेच आहे. स्पर्धा आयोजनात कर्मचारी नसल्याने अनेक अडचणी येत असतात. अशाही परिस्थितीत क्रीडा विभागाचा कारभार रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- अंकिता मयेकर, प्रभारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड

चांगले खेळाडू घडवण्यासाठी पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि क्रीडा क्षेत्राला पोषक वातावरणाची गरज असते; मात्र जिल्ह्यात असे वातावरण दिसत नाही. 
- सिद्धार्थ पाटील, खेळाडू, अलिबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Industrial Gas Connection: वाळूज उद्योगांना दिलासा! १० मोठ्या कंपन्यांना पाइप्ड गॅस जोडणी सुरू; गॅस टंचाईवर उपाय; वाळूजमधील उद्योगांकडे आता ‘PNG’चा पर्याय

Sambhajinagar Garbage Issue: कुठे ड्रेनेज फुटली, कुठे कचऱ्याचे ढीग; शहरातील नागरिक त्रस्त; घंटागाडी गायब, रस्त्यावर कचरा

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2026

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026

SCROLL FOR NEXT