NCP-Mumbai-Morcha 
मुंबई

चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी : खा. सुळे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जालन्यातील 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मुंबई अध्यक्ष नवाब मालिकांसह पोलिसांना भेटून निवेदन दिले. त्यावेळी प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केल्याचे सांगितले. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांना संरक्षण पुरवण्याची मागणीही खासदार सुळे यांनी केली. 

याशिवाय पीडित मुलीचा भाऊ या मोर्चामध्ये सहभागी झाला होता. त्याने न्याय मिळेपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी कारवाई न केल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही यावेळी पीडित मुलीच्या भावाने दिला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार या घटनेला जबाबदार असून सरकारने या आरोपींना फाशी द्यावी. राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जालन्यातील 19 वर्षीय मुलीवर चेंबूर परिसरातील नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजून सामूहिक बलात्कार केला. एक महिना ही मुलगी मृत्यूशी झुंज देत होती. मात्र, गुरुवारी औरंगाबाद येथील घाटी शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे चेंबुर लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलीस ठाणे या दरम्यान मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. चुनाभट्टी पोलीस ठाण्याजवळ मोर्चा पोहोचल्यानंतर पोलीसांनी हा मोर्चा अडवला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक आणि आमदार विद्या चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेतली. दीड महिना उलटून गेला तरी अजूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, त्यामुळे त्या नराधमांना तत्काळ अटक करावी. आणि या प्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी व्हावी, अशी मागणी केली. आणि जर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, तर राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : कोकणातील लोककलांना राजाश्रय मिळायला हवा; अनिकेत तटकरे

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT