Shruti-Pardhye 
मुंबई

मुंबई: श्रुतीला बनायचं होतं इंजिनीयर; पावसानं सगळंच संपवलं...

मुंबई: श्रुतीला बनायचं होतं इंजिनीयर; पावसानं सगळंच संपवलं... परिक्षेसाठी श्रुती चेंबूरच्या घरी आली अन् रात्रीच्या पावसात...

भाग्यश्री भुवड

परिक्षेसाठी श्रुती चेंबूरच्या घरी आली अन् रात्रीच्या पावसात...

मुंबई: शहरात शनिवारी रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाने सगळ्यांनाच धडकी भरवली. रविवारी अतिशय थोडा वेळ पावसाने विश्रांती घेतली होती. पण त्यानंतर पुन्हा पावसाने जोरदार आगमन केले. शनिवारच्या पावसामुळे चेंबूरमधील भारतनगर परिसरात एकाच कुटुंबातील चौघांवर काळाने घाला घातला. पारधे कुटुंबात गौतम पारधे, पंचशीला पारधे आणि मुलं श्रुती, शुभम आणि दिक्षा पारधे हे पाच जण होते. हे कुटुंब भारतनगरमध्ये वास्तव्यास होतं. पाच जणांचा परिवार सुखाने राहत होता, पण शनिवारी रात्री मुसळधार पावसाने या परिवाराला कायमचं एकमेकांपासून वेगळं केलं. (Chembur Wall Collapse Incident Shruti Pardhye Unfortunate Death mother 3 others dies vjb 91)

...तर आज श्रुती जिवंत असती !

चेंबूरच्या वाशी नाका येथील भारतनगरमध्ये राहणाऱ्या कुटुंबात श्रुती आणि तिचं पाच जणांचं कुटुंब राहत होतं. पावसाच्या रुपात या कुटुंबावर निसर्गाने घाला घातला. संरक्षक भिंत घरावर कोसळली अन् फक्त 12 वर्षांची दिक्षा वाचली. बाकी सारं काही संपलं... श्रुती सोडून इतर लोक इथेच राहत होते. श्रुती मात्र कल्याणला आजीकडे राहत होती. काही कारणामुळे श्रुती काही दिवसांपूर्वीच भारतनगरला आली होती. श्रुतीला शिकून खूप मोठं व्हायचं होतं. ती ११ वी पास होऊन बारावीला गेली होती. इंजिनिअर होण्याचं श्रुतीचं स्वप्न होतं. पण एका रात्रीच्या पावसाने सगळी स्वप्न कायमची संपवून टाकली, अशी भावना श्रुतीची मावशी सविता यादव यांनी व्यक्त केली.

पारधे कुटंबाला काय भीती होती...

पंचशिला यांना सविता आणि वैशाली या दोन बहिणी. सविता यांनी 'सकाळ'शी संवाद साधला. सवितापेक्षा पंचशिला या लहान होत्या. 'वाशीनाका येथे राहणाऱ्या पंचशिला तिथे राहत असताना कायम तिथल्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे भीतीच्या सावटाखाली जगायच्या. पंचशिलाने अनेकदा फोनवर बोलताना त्या परिसरात पाणी भरण्याचा अनुभव साांगितला होता. शिवाय, दरड आणि भिंत कोसळण्याबाबत ही सांगितले होते. पण असं कधी त्यांच्यासोबत होईल असं वाटलं नव्हतं', असं सांगताना सविता यादव यांचे डोळे अक्षरश: पाणावले.

चिमुरड्या दिक्षाला कसं समजवणार..??

श्रुती काही दिवसांपूर्वीच कल्याणहून आजीच्या घरातून भारतनगरमध्ये परतली होती. पण कालच्या दुर्घटनेत कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने या सर्व घटनेत १२ वर्षांची दिक्षा वाचली. पण, संपूर्ण कुटुंब या घटनेत मृत्यूमुखी पडल्यामुळे आता तिला काय आणि कसं समजवायचं? असा प्रश्न तिची मावशी सविता यादव यांना पडला असल्याचं त्या म्हणाल्या.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT