Pharmacy
Pharmacy  
मुंबई

फार्मसींना कोरोना टेस्टिंग सेल्फ किटचे रेकॉर्ड ठेवणं बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत काही दिवसांपासून सेल्फ कोरोना टेस्टरच्या माध्यमातून घरच्या घरी चाचण्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये बाधित आल्यानंतरही अनेक जण पालिकेला माहिती कळवत नसल्याने प्रसाराचा धोका वाढत असल्याचे समोर आले होते. याविषयी पालिकेने चिंता व्यक्त केली होती. आता यावर पालिकेने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोरोना टेस्टचे सेल्फ कीट (Corona testing self kit) विकणाऱ्या मेडिकलवाल्यांना (Chemist) सेल्फ किटचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबत आजच सविस्तर चर्चा करून नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

तिसऱ्या लाटेत अनेक केमिस्टमध्ये (Chemist) सेल्फ किट्स (Corona testing self kit) घेऊन घरच्या घरी चाचण्या करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे पण, यातून कोविड बाधितांचा किंवा सौम्य लक्षण असणाऱ्यांचा अहवाल नोंद होत नव्हता. यासह या सेल्फ कोविड किट्सची विक्री ही मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातून हा निर्णय पालिका घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका कोरोना टेस्टिंग किट (Corona testing self kit) संदर्भात लवकरच नियमावली जारी करणार आहे. मेडिकल दुकान मालकांना कोरोना सेल्फ टेस्टिंग किटचे रेकॉर्ड ठेवण्याबाबत मुंबई महापालिका सूचना देणार आहे. यामध्ये बाधित आल्यानंतरही काही जण पालिकेला माहिती कळवत नसल्याने प्रसाराचा धोका वाढत असल्याचे समोर आले. त्यामुळे यापुढे कोरोना टेस्टचे सेल्फ किट विकणाऱ्या मेडिकल दुकान मालकांना यापुढे सेल्फ किटचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच नियमावली जाहीर करण्यात येणार आहे, असेही काकाणी यांनी सांगितले आहे.

अंतिम नियमावली एक-दोन दिवसांत

टेस्टिंग किट ज्या मॅन्युफॅक्चरकडून मुंबईतील मेडिकल दुकानांमध्ये जातात त्या मेडिकल दुकान मालकांना दुकानातून किती टेस्टिंग किट (Corona testing self kit) जात आहेत? किती जणांनी टेस्टिंग किट विकत घेतले? किती जणांचे अहवाल पॉझिटिव्ह? आणि निगेटिव्ह आले याचा तपशील सुद्धा ठेवावा लागणार आहे. जेणेकरून ज्यांनी सेल्फ टेस्टिंग किटद्वारे कोरोना चाचणी केली त्यांच्या अहवालाची माहिती प्रशासनापर्यंत पारदर्शकपणे पोहोचेल. या नियमावली बाबत पालिका प्रशासन अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम नियमावली एक-दोन दिवसांत जारी करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT