मुंबई

'रेमडिसिव्हिर'च्या वक्तव्यावरून दरेकरांनी घेतला भुजबळांचा समाचार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: कोरोनाचा राज्यातील कहर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील विविध ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. लॉकडाउन लावूनही संसर्गाचे प्रमाणे अपेक्षेप्रमाणे कमी होताना दिसत नाहीये. राज्यातील अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवांचा तुटवडा दिसून येतोय. कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या रेमडिसिव्हिर औषधाचा तुटवडा ही सध्या राज्यातील जनतेसाठी आणि सरकारसाठी चिंतेची बाब आहे. काही ठिकाणी रेमडिसिव्हिरचा काळाबाजार सुरू असताना नाशिकमध्ये मात्र औषधासाठा अगदीच अपुरा असल्याचे चित्र आहे. या मुद्द्यावर राज्याचे मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी, 'रेमडिसिव्हिर घरी तयार होत नाही', असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चांगलाच समाचार घेतला.

"छगन भुजबळ यांनी रेमडीसीवर आमच्या घरात तयार होत नाही असे म्हणणे म्हणजे सरकार या व्यवस्थेत हतबल असल्याचा एकाअर्थी पुरावाच आहे. अशा प्रकारची वक्तव्ये करणं म्हणजे सरकारने आपल्या कर्तव्यापासून आणि जबाबदारीपासून दूर जाणं असं होतं. छगन भुजबळ हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी असे वक्तव्य करणं योग्य नाही. जेव्हा आपातकालीन स्थिती असते, तेव्हा राज्याची जनता घाबरलेली असते. त्या जनतेला समजावून सांगणं आणि त्यांच्या रोषाला शांतपणे सामोरं जाणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. त्यामुळे भुजबळांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो", अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

भुजबळ नक्की काय म्हणाले?

"सध्या तुटवडा आहे. माझ्या घरात तर औषध नाहीत. कलेक्टरच्या घरीदेखील औषधं नाहीत. जर कोणी मला सांगितलं की या दुकानात साठा करण्यात आलाय तर मी स्वत: जाइन आणि तो साठा गरजूंसाठी उपलब्ध करून देईन. सुरूवातीच्या काळात रेमडेसिव्हिरचा साठा उधळला गेला. त्यामुळे आता त्याचा तुटवडा आहे. त्याला कोण काय करणार? मी माझ्या घरी ते औषध बनवत नाही", असं विधान नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला.

मुंबईत रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकताच रेमडिसिव्हिरचा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिला. त्यानंतर शुक्रवारी खासगीत रेमडिसिव्हिर इंजेक्शन जास्त किमतीत विकणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा 10 च्या पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी डझनभर इंजेक्शनचा साठा जप्त केला. हे इंजेक्शन आरोपींनी कुठून आणले, कुठे विकणार होते? याचा आता गुन्हे शाखेचे पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Toll Rule India : वाहनचालकांसाठी खुशखबर ! महामार्गावर टोल नियमात मोठा बदल, खर्च होणार कमी; काय आहे सरकारचा प्लॅन?

कमळी शोधणार सरोजच्या मृत्यूचं सत्य ते जय वाचवणार शरूचा जीव; या आठवड्यात तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये काय घडणार?

Latest Marathi News Live Update : जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित बनावट सहीप्रकरणी मोठी कारवाई; चामोर्शी नगरसेवकाला ५ दिवसांची पोलीस कोठडी

दारूवर तुमचा खर्च, सरकारची मात्र हजारो कोटींची कमाई! अवघ्या 2 महिन्यांत या राज्याने कमावले 10,500 कोटी; महाराष्ट्राचा आकडा किती?

Sachin Ahir: सचिन अहिरांचा उपसभापतीपदासाठी अर्ज; ठाकरे गटाला धक्का, शिंदेसेनेत जाणार, मुंबईच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT