rajan.jpg 
मुंबई

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला १० वर्ष कारावास, बिल्डरवर केला होता हल्ला

दीनानाथ परब

मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. २०१३ साली अजय गोसालिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात छोटा राजनला ही दहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. छोटा राजनसह अन्य आरोपींना मंगळवारी न्यायालयाने दोषी ठरवले होते. छोटा राजनला पाच लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण?
आधी बुकी असलेला अजय गोसालिया नंतर बांधकाम क्षेत्रात उतरला. २८ ऑगस्ट २०१३ रोजी ५२ वर्षीय गोसालियावर तिघांनी गोळीबार केला होता. मालाड पश्चिमेला असलेल्या मॉलमधून बाहेर येताना हा गोळीबार झाला होता. छोटा राजनच्या इशाऱ्यावरुन हा गोळीबार झाल्याचा सीबीआयचा आरोप होता. सतीश कालिया या आपल्या साथीदारामार्फत छोटा राजनने हा हल्ला घडवून आणला. गोसालिया या गोळीबारात गंभीर जखमी झाला होता. सुदैवाने एक गोळी सोन्याच्या पेंडट लागल्याने गोसालिया या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला होता. 
 

या प्रकरणात मोक्का लावण्यात लागला
ऑगस्ट २०१३ साली बांगूर नगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला. आयपीसीच्या विविध कलमांतर्गत अज्ज्ञात आरोपींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. काही दिवसांनी या प्रकरणाचा तपास डीसीबीकडे सोपवण्यात आला. या प्रकरणात मोक्का लावण्यात आला. स्पेशल युनिटने सात आरोपींविरोधात नोव्हेंबर २०१३ मध्ये आरोपपत्र दाखल केले. 
प्रकाश निकम, सतीश कालिया आणि छोटा राजन हे तीन आरोपी वाँटेड होते. त्यानंतर पत्रकार जे डे हत्या प्रकरणात निकम आणि कालियाला अटक झाली. छोटा राजनला बालीवरुन भारतात आणल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. २१ एप्रिल २०१६ ला सीबीआयने या प्रकरणात राजनला ताब्यात घेतले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT