Beed Bird Flu News 
मुंबई

बर्ड फ्लूचं संकट वाढलं, मंत्रालयात तातडीची बैठक

ओमकार वाबळे

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात बर्ड फ्लूमुळे अचानक कोंबड्या मेल्याने प्रशासनाने दखल घेतली आहे. वेहळोली येथील एका फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची (Bird flu) लागण झाली. आतापर्यंत ३०० हून अधिक कोंबड्या दगवल्याचं समोर आलं.

यानंतर पशुसंवर्धन विभागाने एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या परिसरातील २५ हजार कोंबड्यांना बाधा झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर मंत्रालयात सचिव पातळीवर तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. (Bird Flu in Thane)

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू अढळल्याने पशुसर्वंधन खात्याने तत्काळ पावलं उचलायला सुरुवात केली आहे. खात्याचे सचिव बैठकीत उपस्थित आहेत. सध्या पशुसंवर्धन मंत्री रत्नागिरीत असल्याने त्यांना या बैठकीची माहिती पुरवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आतापर्यंत ३०० कोंबड्या मारल्या

ठाण्यात फ्लूचं प्रकरण समोस आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही आदेश दिले आहेत. अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नसून संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं आहे.

मौजे वेहळोली, ता.शहापूर जि.ठाणे येथे काही कोंबड्या दगावल्या होत्या. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल काल प्राप्त झाला. त्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून बर्ड फ्लूचा संसर्ग जिल्ह्यात इतरत्र कुठेही पसरू नये यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदेसेनेचा मोठा धमाका! ३ कॅबिनेट मंत्र्यांवर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या बदलांनी राजकारणात खळबळ

Mumbai News: BKC मध्ये थरार! जिओ वर्ल्ड ड्राईव्हजवळ ७ फूट अजगर आढळला; पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT