BMC Esakal
मुंबई

BMC: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्याची ९५ लाख रूपयांची पाणीपट्टी थकली; BMC कधी करणार वसुली?

BMC: सर्वसामान्यांच्या घराची पाणीपट्टी, घरपट्टी धकली की लगेच कारवाई होते. मात्र, व्यवस्थेमध्ये पद पाहून कारवाई होत असल्याचं चित्र दिसून येत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबई: सर्वसामान्यांच्या घराची पाणीपट्टी, घरपट्टी थकली की लगेच कारवाई होते. मात्र, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शासकीय बंगल्यांचे लाखो रूपयांचं पाणीबील थकल्याची माहिती समोर आली आहे. शासकीय बंगल्याचं एकूण ९५ लाख रूपयांचं पाणी बील थकल्याची माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेने ही लोखो रूपयांची थकबाकी वसूल केलेली नाही.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी हा माहितीच्या आधिकारात हा तपशील मागवला होता. यामध्ये फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच नव्हे तर सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, उदय सामंत या नेत्यांच्या शासकीय बंगल्याचा समावेश आहे. दरम्यान सामान्यांना एक न्याय आणि नेत्यांना वेगळा न्याय असे चित्र दिसून येत आहे.

कोणत्या नेत्याचे किती बील थकलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - वर्षा - ११ लाख ६९ हजार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - नंदनवन - १८ लाख ४८ हजार

दिपक केसरकर - रामटेक -११ लाख ३० हजार

उदय सामंत - मुक्तागिरी - ६ लाख ८३ हजार

सुधीर मुनगंटीवार - पर्णकुटी - ६ लाख ५२ हजार

डॉ. विजयकुमार गावित - चित्रकूट - ५ लाख १९ हजार

अजित पवार - देवगिरी - ४ लाख ३८ हजार

देवेंद्र फडणवीस - मेघदूत - २ लाख ७३ हजार

देवेंद्र फडणवीस - सागर - १ लाख २६ हजार

गुलाबराव पाटील - जेतवन - १ लाख १८ हजार

राधाकृष्ण विखे पाटील - रॉयलस्टोन - ९२ हजार

या मंत्र्यांकडून पाणीबिलाची वसूली मुंबई महानगरपालिका कधी करणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT