eknath shinde  sakal
मुंबई

Mumbai News : त्यांची अवस्था रावणासारखी होईल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

आपल्या अहंकारापायी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार विकले, त्यांच्या विचारांना तिलांजली दिली, ज्या काँग्रेसला वंदनीय बाळासाहेबांनी कधीच जवळ केले नाही, त्या काँग्रेसला सत्तेच्या मोहापायी आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी कडेवर घेतले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘आपल्या अहंकारापायी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार विकले, त्यांच्या विचारांना तिलांजली दिली, ज्या काँग्रेसला वंदनीय बाळासाहेबांनी कधीच जवळ केले नाही, त्या काँग्रेसला सत्तेच्या मोहापायी आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी कडेवर घेतले. निवडणूक एकाबरोबर जिंकल्या आणि सरकार दुसऱ्यासोबत स्थापन केले. यांच्या अहंकारामुळे राज्य मागे गेले. जी अवस्था अहंकारी रावणाची झाली, तीच अवस्था यांची होईल,’’ अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केली. सत्तेच्या लालसेपोटी ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली त्यांना प्रभू श्रीराम सुबुद्धी देवो, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बाळासाहेब भवन येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, ‘‘राज्याच्या हितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी आम्ही आधीचे सरकार उलथवून लावून जनतेचे सरकार स्थापन केले. आज ते आम्हाला रावण म्हणतात. राम कोण आणि रावण कोण हे जनतेला ठाऊक आहे. ज्यांनी राममंदिराला विरोध केला, प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला त्यांना रामाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही,’’ असे शिंदे यांनी सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT