CM Eknath Shinde 
मुंबई

CM एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर दाखल; मंत्रीमंडळ विस्तारानंतरच 'गृहप्रवेश'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्यातील अनेक धक्कादायक घडामोडीनंतर एकनाथ शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. मात्र मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४० दिवसानंतर एकनाथ शिंदे आज वर्षा बंगल्यावर राहण्यास दाखल झाले आहे. वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असतो. (Eknath Shinde News in Marathi)

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे निश्चित झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वीच वर्षा बंगला सोडला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. आता आज अखेर एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुनावणी आता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष रेंगाळणार अशी चिन्हे आहेत. १२ ऑगस्ट रोजी ही सुनावणी पार पडणार होती. मात्र आता ती १० दिवस लांबणीवर पडली आहे.

आतापर्यंत शिंदे-ठाकरे वादासंदर्भातील पाच याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. मात्र यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यातच सरन्यायाधीश एन.व्ही. रमना हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे शिंदे-ठाकरे वाद रेंगाळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E85 Fuel India : पेट्रोलला पर्याय! आज E85 इंधन लॉन्च होणार, भारत स्वच्छ ऊर्जा क्रांतीचा मोठा टप्पा गाठणार

Can Birds Predict Weather Changes? 'पेरते व्हा, पेरते व्हा!' कोकणात पावशा पक्ष्याची शीळ रानावनात घुमली; शेतकऱ्यांसाठी मान्सूनचा पहिला शुभसंकेत

Latest Marathi News Live Update : मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर

Mumbai News: दहा वर्षांत दीड लाख झाडांवर कुऱ्हाड, विविध प्रकल्पांसाठी बळी; प्रशासनाचा कारभार

Nagpur: निवडणूक व जनगणनेच्या कामात दिरंगाई करणे भोवले ; मंडळ अधिकारी नरेश कुंभलकर निलंबित: विभागीय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT