Bacchu Kadu sakal
मुंबई

Bacchu Kadu : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय उभारण्याचे स्वप्न केले पूर्ण; बच्चू कडू यांची माहिती

दिव्यांग कल्याण मंत्रालय मंत्रीपदाच्या दर्जाचा पदभार हाताळताना केलेला पाठपुरावा आणि मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय उभारण्याचे स्वप्न पूर्ण केले.

दिनेश गोगी

उल्हासनगर - दिव्यांग कल्याण मंत्रालय मंत्रीपदाच्या दर्जाचा पदभार हाताळताना केलेला पाठपुरावा आणि मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय उभारण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी उल्हासनगरातील मेळाव्यात दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिव्यांगांच्या स्वप्नाची पूर्तता केल्याने त्यांचे आपल्यावर ऋण आहेत. त्यामुळे आपण शिवसेनेत सोबत असून कल्याण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे.

उल्हासनगर-4 येथील स्वामी शांती प्रकाश हॉल येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार 13 मे रोजी रात्री पार पडला.यावेळी बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग मंत्रालय उभारण्यात यावे आणि ते स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्षात उतरवले.माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल असले तरी ते सर्वसामान्यसाठी लढलो म्हणून असून गुंडागर्दी केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरोधात ठाणे जिल्हात अनेक वेळा उपोषण तसेच आंदोलन करण्यात आले आहेत. त्यात काही प्रमाणात यश आले असले तरी काही अधिकाऱ्यांवर राजकीय नेत्यांचे वरदहस्त असल्यामुळे त्यांचावर कारवाई होत नाही. असा आरोप करतानाच निवडणूक संपल्यावर मी स्वतः उपोषणाला येऊन बसतो.

मग बघू सरकार या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कशी कारवाई करत नाही. असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, संपर्क प्रमुख हितेश जाधव, शहरप्रमुख प्रधान पाटील, पदाधिकारी बाळकृष्ण पाटील, श्याम भोईर, दिपक लढे, अविनाश सोनवणे, आलम खान, वसंत पानसरे, विजय मढवी, रक्षक म्हात्रे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT