मुंबई

मृत्यूच्या तांडवात नव्या जिवाचा जन्म 

मंगेश सौंदाळकर

मुंबई - अंधेरीतील कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात मृत्यूचे अग्नितांडव सुरू असतानाच एक नवा जीव या जगात आला. रुग्णालयात दाखल झालेल्या गर्भवतीने अग्निशमन दलाच्या शिडीवरून बाहेर येऊन एका बाळाला जन्म दिला. दोघांनाही अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

प्रसूती कळा सुरू झाल्यामुळे ही गर्भवती सोमवारी रुग्णालयात आली होती. आगीमुळे धावपळ सुरू झाल्यावर तिने बचावासाठी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला शिडीवरून सुखरूप बाहेर काढले. रुग्णालयातून बाहेर येताच तिने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर आई आणि बाळाला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलातील जवान शिडीवरून महिलांना खाली उतरवत होते. त्या वेळी एका गर्भवती महिलेने दुसऱ्या महिलेला आधी जायला सांगितले. 

रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी दाखल झालेले संतोष परब यांना एमआरआयसाठी नेण्यात आले होते. त्याच वेळी आग लागली. त्या गोंधळात ते कसेबसे धावत खाली आले. तिसऱ्या मजल्यावर उपचार घेणारे गिरीश पटेलही धुरातून रस्ता काढत बाहेर आले. 

स्थानिक तरुणांची मदत 
रुग्णालयात आग लागल्याचे समजताच स्थानिक तरुण मदतीसाठी धावले. गौतम नगरमधील महिलांच्या साड्या आणि ओढण्यांची रस्सी करून त्यांनी 25 रुग्णांची सुटका केली, असे विशाल लष्करे यांनी सांगितले. 

तिघांची सुटका 
अग्निशमन दलाने रात्री "कुलिंग ऑपरेशन' सुरू केले. त्या वेळी तिसऱ्या मजल्यावर एक बाळ, एक वृद्ध आणि एक पुरुष असे तिघे जण बेशुद्धावस्थेत सापडले. जवानांनी त्या तिघांनाही सुखरूप खाली आणले. 

रुग्णालयाची रचना 
- तळमजला : अपघात विभाग 
- पहिला मजला : बाह्य रुग्ण विभाग 
- दुसरा मजला : स्त्रीरोग व प्रसूती विभाग 
- तिसरा मजला : शस्त्रक्रिया कक्ष 
- चौथा मजला : अतिदक्षता व शस्त्रक्रिया विभाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Sanatan Martand Award : वाराणसी येथील 'संस्कृती संसद २०२६' मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च 'सनातन मार्तंड' पुरस्कार प्रदान

Sharad Pawar Breach Candy Hospital : पुण्यात उपचारानंतर शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात; कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Latest Marathi News Live Update : ५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवाच! हर्षवर्धन सपकाळांचे मंत्र्यांना खुले आव्हान

Success Story: घरची परिस्थिती जेमतेम, पण शिक्षणाची जिद्द कायम; राजश्री साळवेची भूमी अभिलेख विभागात निवड, कष्ट अन् जिद्दीला यशाची साथ

Sugar Prices: सर्वसामान्यांची दिवाळी कडू! सणाच्या तोंडावरच साखरेचे दर वाढले; सध्याचे भाव काय?

SCROLL FOR NEXT