children-corona google
मुंबई

चेंबूर-मानखुर्दच्या बालगृहातील १८ मुलांना कोविडची बाधा

समीर सुर्वे

मुंबई : चेंबूर मानखुर्द (chembur-mankhurd) येथील बाल गृहातील 18 मुलांना (children) कोविडची बाधा (corona infection) झाल्याचे आढळले आहे. लहान मुलांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कोविडची बाधा झाल्याचे आढळणे ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. यापुर्वी मुंबई सेंट्रल (Mumbai central) येथील बालिका अनाथ आश्रमातील 15 बालिकांना कोविडची बाधा झाल्याचे तीन दिवसांपुर्वी आढळले होते.

कोविडच्या दोन लाटांमध्ये लहान मुले सुरक्षीत होती.या काळात बालकांना कोविडचा गंभिर संसर्ग झाला नव्हता.मात्र,तीसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.त्यानंतर तीन दिवसांपुर्वी अनाथआश्रमातील 15 मुलींना कोविडची बाधा झाल्याचे आढळले.त्यातील चार मुली 12 वर्षाखालील आहेत.तर,बाल गृहातील 18 मुले आता पर्यंत बाधीत झाली आहेत.या सर्वांना वाशी नाका येथील कोविड केंद्रात देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे.पालिकेने बालगृह सिल केले असून बाहेरील व्यक्तीना सुधार गृहात जाण्यास अथवा सुधार गृहातील व्यक्तींना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.तसेच,कर्मचाऱ्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे.

काही दिवसांपुर्वी रत्नागिरी जिल्ह्यातून येथे एका मुलाला आणण्यात आले.सुरवातीला त्याची कोविड चाचणी करण्यात आली.मात्र,अहवाल नकारत्मक आला.त्यानंतर ही त्याला इतर मुलांपासून लांब ठेवण्यात आले.या काळात त्याच्या कोविड सदृष्य कोणतीही लक्षणं नव्हती.त्यामुळे त्याला सुधारगृहातील इतर मुलांबरोबर ठेवण्यात आले.त्यापुर्वी त्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याचा अहवाल होकारात्मक आला.

याच काळात दुसऱ्या एका मुलात सर्दी आणि तपाची लक्षण दिसू लागल्यावर त्याचे विलगीकरण करण्यात आले.त्याचा चाचणी अहवालही होकारत्मक आला.नंतर पालिकेने या बालगृहात शिबीर घेऊन 102 मुलांची तपासणी केली.त्यात,आता पर्यंत 18 जणांना वाढा झाल्याचे आढळले आहे.या सर्वांना वाशी नाका येथील कोविड केंद्रात स्थालांतरीत करण्यात आले. यात 9 वर्षापासून 18 वर्षा पर्यंतच्या मुलांचे समावेश आहे. त्यांना देखरेखी खाली ठेवण्यात आले असल्याचे एम पुर्व प्रभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT