चिंचघर देवघर रस्ता.j 
मुंबई

चिंचघर-गौरापूर रस्त्याचे काम पाच वर्षांपासून अपूर्ण; ठेकेदाराला रोज भरवा लागतोय इतका दंड 

दिलीप पाटील

वाडा ः तालुक्‍यातील कुडूस - चिंचघर- गौरापूर रस्ता पावसाने खड्डेमय झाला आहे. मागील पाच वर्षांपासून या रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे; मात्र अद्यापही ते ठेकेदाराला पूर्ण करता आलेले नाही. ठेकेदार व बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम वर्षानुवर्षे सुरूच आहे. रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला प्रतिदिन तीन हजारांचा दंडदेखील आकारला जात आहे. 


तालुक्‍यातील सर्वाधिक वर्दळीचा कुडूस - देवघर - गौरापूर या रस्त्याच्या मजबुतीकरण व रुंदीकरणाचे काम बांधकाम विभागाने गेल्या पाच वर्षांपूर्वी हाती घेतले आहे. कुडूस ते चिंचघर हा 1300 मीटरचा रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा; तर उर्वरित चिंचघर ते देवघर व देवघर ते गौरापूरदरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. 12 किलोमीटरच्या रस्त्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून 9 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर असून सरकारने नाशिकमधील सांगळे कंस्ट्रक्‍शन कंपनीला हे काम दिले आहे.

एका वर्षात हे काम पूर्ण करायचे होते; मात्र पाच वर्षे होऊनही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. 
कुडूस ते चिंचघर हा पहिला टप्पा 1300 मीटर अंतराचे काम क्रॉंकीटीकरण; तर देवघर ते गौरापूर या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र चिंचघर ते देवघर या दुसऱ्या टप्प्याचे काम अपूर्ण असून ते पाच वर्षांनंतरही होऊ शकलेले नाही. झालेला रस्ताही पावसाळ्यात खड्ड्यात गेला असून या परिसरातील आठ ते दहा गावातील नागरिकांचे हाल संपता संपत नाहीत. यासंदर्भात सांगळे कंस्ट्रक्‍शन कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

. 
ठेकेदाराला किती दंड आकारला जात आहे, याचे काही घेणेदेणे नाही. अपूर्ण काम कधी पूर्ण होणार, हा खरा प्रश्न आहे. कालमर्यादेचे बंधन न पाळणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे; तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा 
- श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते, चिंचघर 


शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत ठेकेदाराने काम न केल्याने संबंधित ठेकेदाराला प्रतिदिन तीन हजारांचा दंड आकारला जात आहे. सध्या पाऊस असल्याने रस्त्याचे काम बंद आहे. 
- विनोद घोलप, शाखा अभियंता, पंतप्रधान ग्रामसडक योजना 


The Chinchghar-Gaurapur road has been under construction for the last five years
--------------------------

   ( संपादन ः रोशन मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT