Ganeshotsav 2022 Sakal
मुंबई

Ganeshotsav 2022: चिंतामणी आगमन सोहळ्याला मोबाईल चोरीचं गालबोट; भाविक त्रस्त

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून सगळे सण उत्सव घरातल्या घरातच करावे लागत होते. मात्र यंदा सणांचा उत्साह जोरदार आहे. मुंबईमध्ये मोठ्या धामधुमीत यंदा गणेशोत्सव साजरा होत आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचा आगमन सोहळा काल पार पडला. याला मात्र गालबोट लागल्याचं दिसून आलं. (Ganeshotsav 2022)

शनिवारी चिंचपोकळी इथल्या चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती आगमन सोहळ्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरांनी अनेक भाविकांच्या मोबाईलवर डल्ला मारला आहे. जवळपास ५० हून अधिक मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी काळाचौकी पोलिसांकडे आल्या आहेत.

या आगमन सोहळ्यातली गर्दी ओसरल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की आपले मोबाईल चोरीला गेले आहेत. त्यानंतर या भाविकांनी काळाचौकी पोलिसांत मोबाईल चोरीची तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. सणांच्या काळात टोळ्या कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सणासुदीच्या काळात, गर्दी असताना आपल्या जवळच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT