python sakal media
मुंबई

उरण: चिर्लेत १० फुटी अजगराला जीवदान

सकाळ वृत्तसेवा

उरण : चिर्ले (chirle) येथे मासे पकडण्यासाठी (fishing) तलावात लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या १० फुटी अजगराची (python) चिर्ले येथील निसर्गमित्र आनंद मढवी (aanand Madhavi) व त्यांच्या रेस्क्यू टीमने (rescue team) सुटका केली. त्यानंतर त्याला चिर्ले येथील कानोबा जंगलात (kanoba forest) सोडून दिले. चिर्ले येथील उत्तम घरत यांच्या चाळीच्या बाजूलाच तलाव आहे. त्या तलावात मासे पकडण्यासाठी जाळ लावले होते.

या जाळ्यात माशांसोबत अन्नाच्या शोधात आलेला १० फूट लांबीचा इंडियन रॉक पायथॉन या नावाचा अजगर अडकला होता. ही माहिती उत्तम घरत यांनी सर्पमित्र आनंद मढवी यांना दिली. मढवी यांनी टीमसोबत घटनास्थळी दाखल होत जाळ्यामध्ये अडकलेल्या अजगराला कोणतीही इजा न करता सुरक्षित मुक्त केले. त्यानंतर लगेचच वनक्षेत्रपाल संतोष इंगोले, आर. एस. पवार, आशा वाले, हरिदास करांडे यांच्या उपस्थितीत १० फुटी अजगराला कानोबा जंगलात सोडून दिले. या वेळी आनंद मढवीसह विनीत मढवी, पंकज घरत, सुमित मढवी, मयूर मढवी, बंटी शेळके, शुभम मढवी, दिलीप मढवी, पीयूष लोंगले, नितीन मढवी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

Aashadhi Wari: आषाढी वारीसाठी आळंदी सज्ज! दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश; वारीपूर्व तयारीला अंतिम वेग

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Gold Smuggling Sangli Man Arrested : आसाममध्ये सोने तस्करी करणारा संशयित दिघंचीचा? सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई, 55 कोटींची सोन्याची बिस्किटे जप्त

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

SCROLL FOR NEXT