मुंबई

''राजीनामा म्हणजे प्रकरण संपले नाही, न्यायालयीन निकालासाठी संघर्ष करणार''

कृष्ण जोशी

मुंबई: पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला म्हणजे हे प्रकरण संपले असे नाही. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यासाठी आणि न्यायालयीन खटला पूर्णत्वास नेण्यासाठी संघर्ष करतच राहू, असा इशारा देत राज्य भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नव्या संघर्षाचे रणशिंग फुंकले आहे. 

राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्याही पेक्षा जास्त रान उठवण्याचे काम वाघ यांनी केले होते. त्यांना आमदार आशीष शेलार, राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये, मुंबई भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर देसाई आदींची मोठीच साथ मिळाली होती. राठोड यांच्या कालच्या राजीनाम्यानंतर वाघ यांनी काल रात्री उशिरा सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. या लढ्यात साथ देणाऱ्या प्रसारमाध्यमांचेही त्यांनी आभार मानले आहेत. 
 
महाराष्ट्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यानी संजय राठोड याचा राजीनामा घेतला याबद्दल आभार मानताना जर हा राजीनामा आला नसता तर हे निर्ढावलेपण महाराष्ट्राच्या देशातील प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं ठरलं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्र आजवर देशाला दिशा देत आला असताना इतके गंभीर प्रकार गपगुमान सहन करावेत अशी परिस्थिती आम्ही नक्कीच येऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

हा प्रश्न केवळ पूजा चव्हाण आणि संजय राठोड याचा नाही तर ही विकृती वेळीच ठेचायला हवी. राजीनामा झाला म्हणजे हे प्रकरण संपलं असं नाही. राजीनामा म्हणजे या प्रकरणाची सुरूवात आहे. पूजाला न्याय मिळण्यासाठीचं हे अगदी पहिलं पाऊल आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी अजूनही मोठा संघर्ष करावा लागणार आहे आणि आम्ही तो करू. पुराव्यांच्या आधारे हा खटला न्यायालयीन पातळीवर उभा करणे आणि शेवटाला नेणे हे आव्हानात्मक आहे आणि ते काम पूर्णत्वास नेऊच, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे. 

प्रसारमाध्यमांचे आभार

हा लढा पूजासारख्या असंख्य लेकींसाठी आहे. संजय राठोड प्रकरण हे केवळ या अत्याचाराचे उदाहरण आहे. या लढ्यात मी प्रखर भूमिका घेतली असली, तरी आपली साथ यात अत्यंत महत्त्वाची होती. माझ्या भूमिकेला आपण सर्वांनी व्यासपीठ मिळवून दिल्याने या लढ्याला मोठे बळ मिळाले. आपण आजवर दिलेल्या साथीबद्दल आपल्याला धन्यवाद देते. अशीच साथ पुढेही राहुद्यात, अशा शब्दांत वाघ यांनी हे प्रकरण उचलून धरणाऱ्या प्रसारमाध्यमांचेही आभार मानले आहेत.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Chitra Wagh Reaction on Sanjay Rathod resignation will fight for the verdict

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Satara Zilla Parishad Controversy: सातारा झेडपीत पालकमंत्र्यांचाच उच्छाद; मंत्री गोरे, शिवेंद्रराजे; त्यांनी जे पेरले तेच उगवले, नेमका काय दिला इशारा!

Pune Crime: पुण्यात पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात अल्पवयीन जखमी; मुंढव्यातील घटना, तिघांना अटक..

Gas Shortage: दिलासा! भारतात आलं हजारो टन LPG; अमेरिकेतूनही येतोय टँकर, आणखी किती जहाजं येताएत?

Crime: धक्कादायक! भजी बनवण्यावरून २ बहिणींमध्ये वाद; एकीचं डोकंच फिरलं, संतापात नको ते कृत्य केलं, पालकांना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT