मुंबई

नाताळ - नववर्षांसाठी विशेष गाड्या धावणार; मंगळवारपासून प्रवाशांना बुकिंगची सुविधा

प्रशांत कांबळे

मुंबई :  मध्य रेल्वे मार्गावर नाताळ आणि नववर्षांसाठी पर्यटनासाठी घराबाहेर पडणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. लखनऊ, प्रयागराज, रांची, तिरुनेलवेली,  दरम्यान या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. 

विशेष ट्रेन क्रमांक 02107 आणि विशेष वातानुकूलित ट्रेन क्रमांक 02153 साठी 13 डिसेंबर रोजी तिकीट बुकिंग  सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू केले जाणार आहे.तर कन्फर्म तिकीट असणा-या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. त्यासोबतच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-19  संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे. 

मुंबई- लखनऊ सुपरफास्ट उत्सव विशेष (त्रि-साप्ताहिक)
02107 विशेष ट्रेन
16 डिसेंबर ते 30 जानेवारी पर्यंत  प्रत्येक सोमवार, बुधवार व शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 4.25 वाजता सुटेल आणि लखनऊला दुसर्‍या दिवशी दुपारी 3.30 वाजता पोहोचेल.

02108 विशेष ट्रेन 17 डिसेंबर ते 31 जानेवारी पर्यंत प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणि रविवारी लखनऊ येथून रात्री 10.45 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसर्‍या दिवशी रात्री 9.50 वाजता  पोहोचेल.

मुंबई- प्रयागराज जंक्शन विशेष  वातानुकूलित सुपरफास्ट उत्सव (साप्ताहिक)

02153 विशेष वातानुकूलित ट्रेन 15 डिसेंबर ते 26 जानेवारी पर्यंत प्रत्येक मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 4.40 वाजता  सुटेल आणि प्रयागराज जंक्शनला दुसर्‍या दिवशी दुपारी 4.30 वाजता पोहोचेल.

 02154 विशेष वातानुकूलित ट्रेन 16 डिसेंबर ते 27 जानेवारी पर्यंत प्रत्येक बुधवारी प्रयागराज जंक्शन येथून 7 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी 4.15 वाजता पोहोचेल.

Christmas and new year special trains for passengers from Tuesday

-----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT