mumbai firing esakal
मुंबई

Mumbai Crime News : चुनाभट्टी गोळीबार प्रकरणातील ४ शूटर अटकेत, घटनेत एकाचा झाला होता मृत्यू

मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरात रविवारी दुपारी झालेल्या शूटआऊट प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना सोमवारी अटक केली. याप्रकरणी पाचव्या आरोपी शूटरचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : चुनाभट्टी परिसरात रविवारी दुपारी झालेल्या शूटआऊट प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना सोमवारी अटक केली. याप्रकरणी पाचव्या आरोपी शूटरचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

आशुतोष गावंड (२५), सनी पाटील (३७), नरेश पाटील (४२) आणि सागर सावंत (३६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते सर्व चुनाभट्टी येथील रहिवासी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, प्रभाकर पचिंद्रे हा पाचवा आरोपी फरारी आहे. ही घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. या गोळीबारात गुंड सुमित येरुणकर याचा मृत्यू झाला, तर आठ वर्षांच्या मुलीसह चार जण जखमी झाले आहेत.

चुनाभट्टीच्या आझाद गल्ली भागात रविवारी दुपारी ३.१५च्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी गुंड सुमित येरुणकर यांच्यासह एका गटाला लक्ष्य करत १० गोळ्या झाडल्या. जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तत्काळ नऊ पथके तयार केली होती. न्यायालयाने अटक आरोपींना १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT