मुंबई

सिडको, पालिकेचे कामकाज ठप्प

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा सोमवारी (ता. २५) प्रशिक्षणाचा पहिला दिवस असल्याने सिडको व महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणासाठी हजर झाले. त्यामुळे सिडको व महापालिका मुख्यालयातील कार्यालये ओस पडली होती; परंतु याची माहिती नसल्याने कामांसाठी आलेल्या नागरिकांना निराश होऊन परतावे लागले.  

२९ एप्रिलला मतदान व २३ मेच्या निकाल प्रक्रियेसाठी महापालिका व सिडको कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विविध सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना थेट नियुक्तिपत्र पाठवले आहे. नवी मुंबईतील कर्मचाऱ्यांसाठी नेरूळ येथील आगरी-कोळी भवनात सकाळी १० ते अगदी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबिराला गैरहजर राहिल्यास कारवाईची तरतूद असल्याने सिडको व महापालिकेतील सर्व लिपिक, शिपाई, उपायुक्त, भूमापक, भूमी अभिलेख अशा सर्व हुद्द्यांवरील अधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावली आहे. 

सकाळपासून सर्वच अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणाला गेल्यामुळे सिडको कार्यालयातील अभियांत्रिकी, लेखा विभाग, नियोजन, मालमत्ता, वसाहत, परवाना, जनसंपर्क, सीएफसी आदी विभागांसह सर्व कार्यालयांमध्ये एकही कर्मचारी वा अधिकारी हजर नव्हता. 

मालमत्ता, वसाहत, पणन या महत्त्वाच्या विभागांत कर्मचारी नसल्याने दिवसभरासाठी सिडकोचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले होते. कार्यालये रिकामी असल्याने सिडकोच्या सुरक्षा रक्षकांनी दैनंदिन कामाकरिता सिडकोत आलेल्या नागरिकांना कार्यालयात प्रवेश दिला नाही. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालत संताप व्यक्त केला. महापालिकेची विभाग कार्यालये व मुख्यालयातही हीच अवस्था होती. मुख्यालयातील बहुतांश विभागांतील कर्मचारी व अधिकारी प्रशिक्षण शिबिरासाठी गेल्याने कामकाज रोडावले होते. 

मागणी फेटाळली 
सिडको कार्यालयातील वरच्या श्रेणीतील अधिकाऱ्यांना सूट मिळावी याकरिता ३०० जणांची यादी निवडणूक विभागाकडे सिडकोच्या कार्मिक विभागातर्फे पाठवण्यात आली होती; परंतु त्यापैकी मोजक्याच कर्मचाऱ्यांना सूट देऊन इतरांना हजर राहण्याचे आदेश निवडणूक विभागाकडून देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT