मुंबई

सिडको लॉटरी विजेत्यांना दिलासा! जून अखेरीस मिळणार घरे

शिर्के कंपनीने पाळला शब्द; जून अखेरीस देणार सिडकोला घरांचा ताबा

तेजस वाघमारे

मुंबई : सिडकोने (cidco) आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाच्या योजनेअंतर्गत अडीच वर्षांपूर्वी नवी मुंबईतील विविध भागातील घरांची सोडत काढली. या सोडतीमधील घरे उभारण्याच्या कामात लॉकडाउनमुळे अनेक संकटे आली. त्यावर मात करत बी.जी. शिर्के कन्ट्रक्शन टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीने तातडीने या घरांचा ताबा सिडकोला देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार, कंपनीने त्यांचा शब्द पाळला आहे. येत्या जून महिन्याच्या अखेरीस सुमारे 15 हजार घरांचा ताबा सिडकोला देण्यात येणार असून विजेत्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. (cidco-possession-of-houses-in-june-ending)

सिडकोने 2018 मध्ये घणसोली, खारघर, कळंबोली, द्रोणागिरी व तळोजा येथील महागृहनिर्माण योजनेअंतर्गत सुमारे 15 हजार घरांची सोडत काढली. सोडतीमधील विजेत्यांना 2020 मध्ये घरांचा ताबा देण्यात येणार होता. मात्र कोरोना महामारी आणि देशात लॉकडाउन लागू केल्यानंतर प्रकल्पाच्या कामात व्यत्यय आला. प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे साडे पाच हजार कामगार काम करत होते. मात्र लॉकडाउनमध्ये बहुतांश कामगार आपल्या गावी परतले. यामुळे प्रकल्पाच्या कामावर परिणाम झाला.

सोडतीमधील विजेत्यांकडून घरांचा ताबा देण्याची मागणी होऊ लागल्याने सिडकोने जून 2021 पर्यंत घरांचा ताबा देण्याची विनंती शिर्के कंपनीला केली होती. त्यानुसार, कंपनीने लॉकडाउनमध्ये गावी गेलेल्या कामगारांना विमान, रेल्वे, बसच्या माध्यमातून पुन्हा कामाच्या ठिकाणी आणले. त्यांचे वास्तव्य, जेवणाची व्यवस्थाही कंपनीने प्रकल्पाच्या ठिकाणीच केली. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहे.

शिर्के कंपनीमार्फत कळंबोली आणि परिसरात उभारलेल्या घरांची वीज, पाणी, रस्ते, लिफ्ट आदी सर्व कामे पूर्ण केली आहेत. काही इमारतींना रंग लावण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. ते लवकरच पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण होताच जून महिन्याच्या अखेरीस सिडकोला घराचा ताबा देण्यात येणार आहे. त्यामुळे सोडतीमध्ये विजेते ठरलेल्या नागरिकांना लवकरच घरांचा ताबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

"लॉकडाउनच्या संकटात गावी गेलेल्या कामगारांना विमान, रेल्वेच्या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यातून प्रकल्पाच्या ठिकाणी आणले. त्यांच्या जेवण, आरोग्याची काळजी घेत आम्ही प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण केले आहे. सिडकोला दिलेल्या शब्दानुसार आम्ही जून अखेर 15 हजार घरे ताब्यात देणार आहेत", असं शिर्के कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.व्ही. कुदळे म्हणाले.

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपी सोनमची ११ महिन्यांनंतर सुटका! न्यायालयाने दिला जामीन, काय आहे नेमकं प्रकरण?

Latest Marathi News Live Update : संजय गायकवाडांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा

T20 World Cup : १८ वर्षीय खेळाडूची वर्ल्ड कप संघात निवड; कोण आहे Tilly Corteen-Coleman? टीम इंडिया...

Kolhapur Farmers Protest : 'दांडके पाठीत फोडू, वेळ पडली तर बलिदानही देऊ, पण वाडवडिलांची जमीन...; शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध

Mass Marriage Ceremony : आख्खा गावात लगीन घाई, गावाला आले यात्रेचे स्वरूप; निमगावात सात जोडपे विवाहाच्या पवित्र बंधनात बांधले गेले

SCROLL FOR NEXT