मुंबई

सिप्ला कंपनीने आणलं जगातील सर्वात स्वस्त रेमेडेसीविर जेनेरिक औषध! जाणून घ्या किंमत

मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना बाधित रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या रेमडेसीवीर औषधासारखे जेनेरिक औषध तयार करण्याचा निर्णय सिप्ला लिमिटेड कंपनीने घेतला आहे. रुग्णांसाठी माफक दरात हे औषध उपलब्ध होणार आहे. ही किंत. जगभरात उपलब्ध औषधांपैकी कोरोना रुग्णांसाठीचे हे सर्वात स्वस्त औषध ठरणार आहे.

कोरोनासाठी रेमडेसीवीर या औषधाला मोठी मागणी आहे. हे लक्षात घेऊन या औषधाची किंमत 5 हजाराच्या वर जाणार नाही याची काळजी घेत असल्याचे सिप्ला कंपनीकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार हे औषध बनवण्यात आले असून त्याची पहिली बॅच तयार झाली असल्याचे ही सिप्ला कंपनीशी संबंधित फार्मा आणि उत्पादकांनी सांगितले.

सिप्ला कंपनी सिप्रेमी नावाचे औषध बनवले असून पहिल्या बॅच मध्ये 80 हजार बाटल्या बाजारात उपलब्ध करणार असल्याचे सिप्ला चे भारतातील बिझिनेस चीफ ऍगझीक्युटिव्ही ऑफिसर तसेच उपाध्यक्ष निखिल चोप्रा यांनी सांगितले. हे औषध केवळ सरकार तसेच रुग्णालयाच्या मार्फतच मिळणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

या औषधाची 10 हजाराच्या पहिली बॅच तयार असून त्याची किंमत प्रत्येकी 4 हजार रुपये इतकी असणार आहे. बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर औषधांच्या तूननेत हे औषध 800 रुपयांनी स्वस्त असल्याचा सांगण्यात येते. युरोपियन कंपनी मायलन कडून हे औषध बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे. खासगी लॅब मध्ये देण्यात येणारे कोव्हीफॉर या औषधाची किंमत 5,400 इतकी आकारली जाते. त्या तुलनेत हे औषध केवळ 4,800 रुपयात उपलब्ध होणार आहे.

      देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या आजारांशी संबंधित असलेली औषध बनवण्याचा प्रयत्न औषध कंपन्या करत आहेत. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसीवीर सारखी औषध गरजेची आहेत ती औषध बनवण्यासाठी अधिकाधिक कंपन्या उतरल्या तर मुबलक आणि परवडणाऱ्या किमतीत औषध उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.

      युरोपियन कंपनी गिलीड सायन्स लिमिटेड कडून रेमेडेसीविर औषध बनवलं जात. या औषधाची किंमत ही 25 ते 30 हजाराच्या दरम्यान आहे. रेमेडिसीविर औषधाच्या फॉर्म्युला वापरून जेनेरिक औषध बनवण्यासाठी कंपनीकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इतर कंपन्यांंकडून देखील रेमेडिसीविर सारखी औषध माफक दरात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.

      भारतात सध्या जगातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेला तिसरा देश बनला आहे. भारताने युनायटेड स्टेट आणि ब्राझील ला मागे टाकले आहे.  त्यामुळे इथे या औषधांची अधिक आवश्यकता भासणार आहे. एका गंभीर रुग्णाला साधारणता पाच दिवसांच्या कोर्स मध्ये 6 इंजेक्शन ची गरज आहे. त्यामुळे स्वस्त आणि मुबलक प्रमाणात ही औषध उपलब्ध होणे गरजेचे आहे. 

------------------

(संपादन - तुषार सोनवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT