मुंबई

काळाचौकी येथे झाड कोसळून नागरिकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : काळा चौकी येथील अभ्युदयनगर परिसरात झाड कोसळून नाथूराम चुनालाल मौर्य (48) यांचा मृत्यू झाला आणि शोहेब फरिद शेख (36) हे जखमी झाले. मौर्य यांचे या झाडाखाली चप्पलचे दुकान होते. 

काळा चौकीतील अभ्युदयनगर परिसरात न्यू शिवाजी रात्रशाळेसमोरचे मोठे झाड शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कोसळले. या दुर्घटनेत झाडाखालील चप्पलच्या दुकानाचे मालक नाथूराम मौर्य यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळ येथील केईएम रुग्णालयात पाठवला. जखमी झालेले शोहेब शेख यांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिका नियंत्रण कक्षाने सांगितले.  

मुंबईत पाच वर्षात 31 मृत्यू 

मुंबईत गेल्या पाच वर्षात झाडे पडून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर,आजचा बळी हा 31 वा होता. तसेच या वर्षातील हा सातवा मृत्यू आहे. 18 मे रोजी अंधेरी येथे झाड पडले. त्यात मिरारोडचे रहिवाशी सी. के. गोपाळकृष्णन जखमी झाले होते त्यांचा 23 मे रोजी मृत्यू झाला. तर जुहू येथे 28 जून रोजी अंबिका काळे या कंत्राटी कामगाराच्या अंगावर आंब्याचे झाड पडून मृत्यू झाला. 13 जून रोजी अंधेरी महाकाली केव्हज रोड तक्षशिला सोसायटी येथे अनिल नामदेव घोसाळकर यांच्या अंगावर झाड पडले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 14 जून रोजी उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. याच दिवशी मालाडमध्ये झाडाची फांदी कोसळून शैलेश मोहनलाल राठोड या 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याच दिवशी रात्री गोवंडी येथे झाड कोसळून नितीन शिरवळकर यांचा मृत्यू झाला आहे. तर 12 ऑगस्ट रोजी मुलुंड येथे अशोक शिंगरे या व्यक्तीचा झाड पडून मृत्यू झाला. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT