कुडूस पोलिस दूरक्षेत्रात बोलावण्यात आलेल्या बैठकीस उपस्थित नागरिक आणि पोलिस. 
मुंबई

आपलं घर सोडून चिंचघरवासीं पाहुण्यांच्या दारात!

सकाळ वृत्तसेवा

वाडा ः वाडा तालुक्‍यातील चिंचघर गावात गेल्या चार दिवसांत शिवसैनिकांच्या तीन चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने येथील नागरिक धास्तावले आहेत. वाहनांच्या नुकसानीच्या भीतीने अनेक जण आपली वाहने आता नातेवाईकांकडे ठेवत असल्याचे समोर आले आहे. 

चिंचघर येथील शिवसैनिक दामोदर लाड यांची कार (१० जानेवारी), भूषण पाटील यांची जीप (ता.११) आणि शिक्षक सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष मनेश पाटील यांच्या चारचाकीच्या (रविवारी) मागील काच पहाटेच्या सुमारास गाडीवर भलेमोठे दगड टाकून फोडण्यात आल्याचे उघड झाले आहे. दिवसागणिक वाहनांचे नुकसान केले जात असल्याने या तोडफोड प्रकरणाचा येथील नागरिकांनी धसका घेतला आहे.

वाहनांचे नुकसान होऊ नये, या भीतीने येथील नागरिक आता आजूबाजूच्या गावातील नातेवाईकांकडेच चारचाकी वाहने नेऊन ठेवत असल्याचे समोर आले आहे. राजकीय वादामुळे की भांडणे लावण्यासाठी हा प्रकार केला जात आहे, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. दरम्यान, कुडूस पोलिस दूरक्षेत्रात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत. 

या प्रकरणानंतर गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आज सकाळी कुडूस पोलिस दूरक्षेत्रात चिंचघर गावातील नागरिकांची बैठक बोलावण्यात आली होती. या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर न लावल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी शिवसैनिकांनी दिला.

वाहनांच्या तोडफोड प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून गाड्यांचे नुकसान करणाऱ्या आरोपींना अटक केली जाईल. परिसरातील फोन टॅप केले असून सीसी टीव्हीची तपासणी करण्यात येत आहे. 
गोविंद बोराडे, 
सहायक पोलिस निरीक्षक, वाडा पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

SCROLL FOR NEXT