मुंबई

नवीन कोविड केंद्रातही अल्प प्रतिसाद, लसीकरणासाठी धारावीकर अनुत्सुक

भाग्यश्री भुवड

मुंबई, 25 : मुंबईतील सर्वात दाटीवाटीची झोपडपट्टी आणि कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील स्थिती झपाट्याने सुधारली. मात्र, आता नवीन वर्षात पुन्हा धारावी हळूहळू कोरोनाचा हॉटस्पॉट बनत आहे. या परिसरातील रुग्णसंख्या आता पुन्हा वाढू लागली आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने लसीकरण मोहिम सुरू केली. धारावीतील जनतेने जास्तीत जास्त लस टोचून घ्यावी यासाठी विशेष नवीन कोविड लसीकरण केंद्र देखील सुरू केले, मात्र या केंद्राला हवातसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे.

जी नॉर्थ परिसरातील लसीकरणाचा वेग वाढावा म्हणून सर्वात आधी माहिम येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. पण, धारावीतील नागरिकांना हे लसीकरण केंद्र दूर पडेल या काळजीने धारावीतील 'छोटा सायन' या रुग्णालयाच्या शेजारी नवीन कोविड 19 लसीकरण केंद्र पालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. सोमवारपासून हे लसीकरण केंद्र सुरू झाले असून गेल्या चार दिवसांत फक्त 350 नागरिकांनीच लसीकरण करुन घेतले आहे. या केंद्राची दिवसाला 1000 लसीकरण करण्याची क्षमता आहे. पण, केंद्र सुरू झाल्यापासून तीन दिवसांत 500 चा ही टप्पा गाठता आलेला नाही. सध्या कोव्हॅक्सिन या लसीचा डोस इथे दिला जात आहे.

1 एप्रिल 2020 मध्ये पहिला कोरोना रुग्ण धारावीत सापडल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत शून्यावर संख्या आली होती. पण, अनलॉक झाल्यानंतर दैनंदिन जीवन सुरू झाले. धारावीतील फॅक्टरी, कंपनी, लेदर कंपन्या सुरू झाल्या. दुसऱ्या लाटेतील सर्वात जास्त रुग्ण हे उच्चभ्रू वसाहतीत सापडू लागले आहेत.  जो आकडा कधी काळी 12 किंवा 13 रुग्ण असा होता तो आता बुधवारी 63 रुग्णांवर जाऊन पोहोचला. आजही 50 च्या वर आकडा आहे.

धारावी पॅटर्न राबवणे कठीण -

पूर्वी ज्या प्रमाणे धारावी पॅटर्न राबवला गेला होता त्याप्रमाणे आता तो पुन्हा राबवणे कठीण आहे. लॉकडाऊन नसल्याकारणाने स्थलांतरीत लोक पुन्हा परतू लागले आहेत. हातावर पोट असणाऱ्या लोकांची पुन्हा दैनंदिन कामे सुरू झाली आहेत. नोकरी जाण्याची भीती, चाचणी करुन घेतली आणि ती पॉझिटिव्ह आली तर 14 दिवस क्वारंटाईन होण्याची भीती या मुख्य कारणांमुळे लोक चाचण्या करण्यासाठी ही पुढाकार घेत नसल्याची खंत जी नॉर्थ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी व्यक्त केली आहे.

जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य -

जी नॉर्थ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या म्हणण्यानुसार, जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य आहे. या परिसरात फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश जास्त आहे. शिवाय, 45 ते 60 वयोगटातील अनेकांना डायबिटीस, मधुमेह हे आजार आहेत.

धारावीची लोकसंख्या 06 लाख 53 हजार एवढी आहे. त्यातील 60 वर्षावरील आणि इतर सहव्याधी असणारे लोक जवळपास 30 ते 40 हजार आहेत. पण, इतर जे फॅक्टरीमध्ये किंवा कंपन्यांमध्ये काम करणारे, नोंद न झालेल्या आकडेवारीनुसार, किमान 1 ते दिड लाख लोकसंख्येला इतर सहव्याधी असू शकेल. त्यामुळे, जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी लसीकरण मॉडेल केले गेले आहे.

लोकापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांचा या कामात सहभाग करुन घेण्याचा विचार केला जात आहे. हेल्पडेस्क, बूथ, रजिस्ट्रेशन, कोमॉर्बिडीटी सर्टिफिकेटस ही सर्व काम करुन घेण्यासाठी लोकप्रतिनिधींचा ही समावेश वाढवणार आहोत. हेल्प पोस्टद्वारे मोफत सर्टिफिकेट्स मिळतील याची ही सुविधा सुरू केली जाणार आहे.

24 भाषांमधून जनजागृती -

लोकांमध्ये जनजागृती वाढावी यासाठी माईकद्वारे वेगवेगळ्या परिसरांमध्ये उद्धघोषणा केली (अनाउंन्समेट) केली जाते. विविध 24 भाषांमधील पोस्टर्स, बॅनर्स, लिफलेट्स, पत्रक  लोकांमध्ये वाटली जात आहेत. या जनजागृतीला प्रतिसाद मिळेल. शिवाय, सुट्ट्यांच्या दिवशीही लोकांची लसीकरणासाठी गर्दी होईल अशी आशा आहे.

सक्रिय रुग्णांचा वाढता धोका -

धारावीत आतापर्यंत 4 हजार 531 एवढी रुग्णसंख्या आहे. तर, 237 सक्रिय रुग्ण आहेत. हा आकडा डिसेंबर - जानेवारी महिन्यात 10 वर पोहोचला होता. तो आता 237 वर पोहोचला असून 317 मृत्यू झाले आहेत. दरम्यान, आणखी ही संख्या वाढेल. त्यामुळे, लसीकरण आणि सुरक्षा घेण्याचे आवाहन दिघावकर यांनी केले आहे.

कोव्हॅक्सिन लस उपलब्ध - 

कोव्हॅक्सिन लसीचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध असून या नवीन कोविड लसीकरण केंद्रात एकाच वेळेस 1000 एवढ्या लोकांचे लसीकरण करुन घेता येईल एवढी क्षमता आहे. दररोज हजार लसींचा साठा उपलब्ध असतो. लसीकरणासाठी संपूर्ण दिवस जातो. शिवाय, दुसऱ्या दिवशी ही लसीकरणाचे थोडेसे परिणाम जाणवू लागतात. त्यामुळे, किमान दोन दिवस तरी लोकांना घरी राहावे लागते. अशा परिस्थितीत लोक सुट्ट्या घेऊन लसीकरणासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे, लसीकरणाचा वेळ बदलावा का याचा ही विचार केला जात आहे. मात्र, पालिका प्रशासनाने जरी कितीही सुविधा उपलब्ध करुन दिल्या तरी लोकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा आणि कोविड सर्व नियम पाळले तरच कोरोना नियंत्रणात येऊ शकेल असेही दिघावकर यांनी स्पष्ट केले आहे. 

citizens of dharavi are not willing take corona vaccine very less response recorded

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT