मुंबई

"उन्हाळ्याचे दिवस आहेत साहेब, वीज कापू नका, तुमच्या पाया पडते; पण त्यांनी माझे ऐकले नाही"

तेजस वाघमारे

मुंबई : राज्यातील थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज खंडित करण्यास दिलेली स्थगिती उठविण्याची घोषणा नुकतीच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधिमंडळात केली. त्यानंतर महावितरण कंपनीने राज्यभरात थकीत वीज ग्राहकांची वीज खंडित करण्याची मोहीम हाती घेतली. त्यामुळे गोरगरिबांना ऐन उन्हाळ्यात आता अंधारात दिवस काढण्याची वेळ आली आहे. काहींनी तर कर्ज काढून वीजबिल भरण्याचा निर्णय घेतलाय. 

लॉकडाउनच्या काळात वीज ग्राहकांना मागील तीन महिन्याच्या सरासरीवर आधारित वीज देयके देण्यात आली होती. यावेळी सरकारने वीजमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे लाखो ग्राहकांनी वीज बिले भरली नाहीत. हीच बिले दर महिन्याला वाढत गेल्याने सर्वसामान्यांना बिले भरणे अवघड झाले आहे. ग्राहकांनी रक्कम न भरल्याने महावितरणची थकबाकी 59 हजार 833 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ग्राहकांकडून वीज बिल वसुली करण्यासाठी महावितरणने वीज ग्राहकांची वीज खंडित करण्यास सुरुवात केली आहे

"मी घरकाम करून कुटुंब चालवते. घरात कोणीही कमवते नसल्याचे मला पाचवर्षीय मुलाची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. माझे 6 हजार 200 रुपयांचे विजेचे बिल थकले होते. ते न भरल्याने माझ्या घरची वीज कापण्यात आली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीज कापू नका यासाठी अधिकाऱ्यांच्या हातापाया पडले. मात्र त्यांनी माझे काहीएक ऐकले नाही. अखेर मी घरकाम करणाऱ्या मालकिणीकडून पैसे उसने घेतले. यातून अर्धे बिल भरले आहे. हे पैसे पगारातून कट होणार आहेत. आता घर कसं चालवायचं हा माझ्यासमोर प्रश्न पडला आहे."

- श्रावणी पगारे - भांडुप येथील रहिवाशी

राज्यातील विविध भागात वीज खंडित करण्यास सुरवात झालेली आहे. भांडुप परिसरातील अनेक रहिवाशांची वीज खंडित केली असून यामुळे झोपड्यांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना ऐन उन्हाळ्यात अंधारात बसण्याची वेळ आली आहे. महावितरणचे कर्मचारी वीज जोडणी तात्पुरती थांबविण्यासाठी 500 रुपयांची मागणी करत असल्याचे भांडुप येथील एका रहिवाशांने नाव न छापणायच्या अटीवर सांगितले.

citizens of mumbai after government orders of cutting power of electricity bill defaulters

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT