eknath shinde Kalyan Dombivli
eknath shinde Kalyan Dombivli  sakal
मुंबई

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात फेरीवाल्यांची दहशत; नागरिकांना सर्रास होतेय मारहाण

शर्मिला वाळुंज

फेरीवाल्यांची दादागिरी ही कल्याण डोंबिवलीकरांसाठी काही नविन राहीलेली नाही. मात्र ही दादागिरी आता एवढी वाढली आहे की नागरिकांना मारहाण करत गंभीर जखमी करण्यासही हे फेरिवाले मागे पुढे पहात नाहीत.

पालिका कर्मचारी तसेच नागरिकांना फेरिवाल्यांनी मारहाण केल्याच्या चार ते पाच घटना आत्तापर्यंत घडल्या आहेत. फेरिवाल्यांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होऊन देखील त्यांना त्याचे भय राहीलेले नाही. आपली दहशत फेरिवाले कायम ठेवून असल्याचेच नुकत्याच घडलेल्या आयटी इंजिनिअर मारहाणी प्रकरणावरुन ही बाब स्पष्ट होत आहे.

कल्याण डोंबिवलीतील स्टेशन परिसर, मुख्य रस्ते, पदपथ हे फेरीवाल्यांनी काबीज केले असून नागरिकांना चालण्यासाठी देखील जागा उरत नाही. डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसरात इंदिरा चौक, कामथ मेडिकल पदपथ, उर्सेकरवाडी, मधुबन टॉकीज गल्ली ही आपल्या मालकीची आहे अशा अविर्भावात ठराविक फेरीवाले हे या भागात वावरत आहेत. (kalyan dombivli ferivale)

या जागेचे आम्ही भाडे देतो असे उघड सांगत दहशतीचा अवलंब करुन व्यवसाय करतात. अनधिकृत फेरिवाले, फुटपाथ, रस्ते काबीज करणारे फेरिवाले यांच्याविरोधात महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असली तरी ही कारवाई केवळ दिखावेगिरी असते. ठराविक पावती फाडली की फेरीवाल्यांना त्यांचे सामान परत मिळते. पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांशी फेरिवाल्यांचे लागेबंध निर्माण झाले आहेत. त्यांना ठराविक रक्कम दिली की ते तुमच्या सामानाला हात देखील लावत नाहीत.

कारवाई करुन सामान घेऊन गेले तरी नंतर राजकीय बड्या पदाधिकाऱ्यांच्या एका फोनवर हे सामान त्यांना परत केले जाते. दिवाळीमध्ये याचा सर्वाधिक प्रत्यय आला. रस्त्यांवर फटाके विक्री करण्यास मनाई असताना देखील फेरीवाल्यांनी स्टॉलवर राजकीय बडे नेते, पदाधिकाऱ्यांचे फोटो लावून बिनधास्त आपला व्यवसाय केल्याचे दिसून आले. केडीएमसीत नवनिर्वाचित आयुक्त आले की ते फेरिवाले हटविण्याचे आदेश काढतात, त्यानुसार अतिक्रमण विभाग तात्पुरती कारवाई करते. शहरात राजकीय नेत्यांच्या सभा, दौरे, आयुक्त, प्रभाग अधिकारी यांचा दौरा असल्यास या परिसरातील फेरिवाले त्या त्या वेळेपुरते हटल्याचे आढळून येते. परंतू हे दौरे, सभा पार पडताच पुन्हा फेरिवाले आपला परिसर काबीज करत आहेत. (kalyan dombivli municipal corparation)

फेरीवाल्यांची दहशत एवढी का वाढली ? त्यांना कोणी खतपाणी दिले हा मुख्य मुद्दा आहे. यावर आता फेरिवाल्यांनीच बोलण्यास सुरुवात केली आहे. फेरिवाल्यांकडून स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षातील पदाधिकारी, पालिका कर्मचारी, अधिकारी यांना ठराविक हप्ते जातात. स्टेशन परिसरातील दुकानदार आपल्याच दुकानातील माल या फेरिवाल्यांना विक्रीसाठी देत दुकानासमोर जागा ही उपलब्ध करुन देतात. यामध्ये बाहेरुन आलेल्या विक्रेत्यांची संख्या अधिक असून त्यांची मुजोरी वाढत आहे.

फेरिवाला पुर्नवसन धोरण अद्याप पालिकेत राबविले गेलेले नाही. याप्रश्नी पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले, नुकतीच फेरिवाला शहर समितीची बैठक झाली आहे. ज्या फेरिवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यांच्या पुनर्वसनाची चर्चा झाली आहे. फेरीवाला झोन निश्चीत करण्यासाठी हरकती सूचना मागविल्या होत्या. त्याची प्रसिद्धी योग्य न झाल्याने त्याला प्रतिसाद मिळाला नाही. येत्या दोन आठवड्यात पुन्हा हरकती सूचना मागविण्यात येतील. त्यानंतर हा विषय फेरीवाला शहर समितीसमोर ठेवला जाईल. नंतर फेरीवाला झोन निश्चीत करुन सर्वेक्षण करण्यात आलेल्या फेरीवाल्यांचे त्याठिकाणी पुनर्वसन करता येणार आहे.

काही ठिकाणी मॉडेल वेडिंग झोन ही संकल्पना राबविली जाणार आहे. त्यामध्ये जे आरक्षित भूखंड आहे. त्यामध्ये वेडिंग झोन जाहिर करायला पाहिजेत. जेणेकरून ज्याठिकाणी बाजार आहे. तो देखील खुला राहिल. काही नागरीकांची मागणी आहे. वेळेची बचत व्हावी याकरीता घराच्या जवळच बाजार असावा. त्यादृष्टीने नियोजन करीत आहोत. लोकांनाही त्रास होऊ नये. तसेच सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्यांचे पुनर्वसन हाेईल. रस्त्याच्या बाजूला असलेले फूटपाथ हे नागरीकांच्या चालण्याकरीत आहे. ज्याठिकाणी फेरीवाल्यांचा अडसर आहे. फूटपाथ मोकळे नाहीत. त्याठिकाणी आपण कारवाई करीत असल्याचे पालिका आयुक्त डॉ. जाखड यांनी सांगितले आहे. (kalyan dombivli municipal corporation area)

21 डिसेंबर 2023 - आयटी इंजिनिअर सुधीर पगारे हा मधुबन टॉकीज गल्लीतून जात असताना त्याला एका फेरिवाल्याचा धक्का लागला. सुधीर याने त्याला जाब विचारला असता चार ते पाच फेरिवाल्यांनी त्याला मारहाण केली. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

31 ऑक्टोबर 2023 - डोंबिवलीतील उर्सेकर वाडी येथील फेरिवाल्यांना हटविण्यासाठी पालिकेचे पथक गेले होते. ग प्रभागातील कामगार सुनील सुर्वे हे पथक प्रमुख साळुंखे यांच्याबरोबर कारवाई करत होते. यावेळी तेथील फेरिवाले बाबू चौरासिया, दिलीप गुप्ता, अनिल गुप्ता यांनी सामान जप्त करण्यास विरोध केला. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

1 ऑक्टोबर 2023 - कल्याण स्कायवॉकवर एका मराठी तरुणाला परप्रांतीय फेरिवाल्यांनी मारहाण केली होती. वस्तू खरेदीवरुन या तरुणाचा फेरिवाल्या सोबत वाद झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना धडा शिकवत पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

30 मे 2023 - मधुबन टॉकीज गल्ली येथून मुंबई महानगर पालिकेतील कर्मचारी नरेश चव्हाण हे जात होते. त्यांचा पाय एका फेरिवाल्याच्या सामानाला लागला. या कारणावरून तीन ते चार फेरिवाल्यांनी नरेश यांना मारहाण केली. याप्रकरणी रामआश्रय वर्मा व श्रीपाल रामआश्रय वर्मा या दोघांविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (crime in kalyan and dombivli)

16 मार्च 2023 - मधुबन टॉकीज गल्लीत रुग्णवाहिका चालक गणेश माळी हा रुग्णवाहिका मागे घेत असताना गाडीचा धक्का लागून फेरिवाल्यांचा कडप्पा खाली पडला. या कारणावरून फेरिवाले अशोक गुप्ता, रोहित गुप्ता यांनी गणेश याला बेदम मारहाण करत त्याला जखमी केले होते. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती.

19 जानेवारी 2021 - तात्कालीन ई प्रभाग क्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे हे घरडा सर्कल येथे पालिका कर्मचाऱ्यांसह फेरिवाल्यांवर कारवाईस गेले होते. यावेळी किरण लाटे, दिपक सावंत व सुजीत सोनी या तिघा फेरिवाल्यांनी कारवाईस विरोध केला. हा विरोध न जुमानता पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरुच ठेवल्याने पालिका कर्मचारी जनार्दन भोईर यांना धुक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (kalyan crime)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT