मुंबई

मुंबईकरांमुळे रायगडकरांची झोप उडाली

अरविंद पाटील

रोहा : कोरोना संसर्गानंतर लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर मुंबई, सुरतसारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेले रायगड जिल्ह्यातील नागरिक त्यांच्या मूळ गावात येत आहेत. लाखापेक्षा अधिक नागरिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला असल्याने नागरिक जीव मुठीत धरून आहेत. यासंदर्भात काही नागरिकांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडेही गाऱ्हाणे मांडले आहे. 

कोरोनाचा सुरुवातीला संसर्ग जिल्ह्यातील पनवेल तालुक्‍यात अधिक वेगाने झाला. आता उरण, श्रीवर्धन आणि पोलादपूर तालुक्‍यांत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांत धास्ती आहे. त्यात मुंबई, सुरतसारख्या अनेक शहरांत वास्तव्यास असलेले नागरिक जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावात येऊ लागल्याने चिंता वाढली आहे. दररोज हजारो नागरिक नानाविविध क्‍लृप्ती लढवत येत आहेत. काही जण तर पायी प्रवास करत आहेत. हे प्रमाण या आठवड्यात वाढले आहे. या व्यक्तींची कोणतीही तपासणी करण्यात आलेली नाही. रोहा-अष्टमी भागाबरोबरच रोहा तालुक्‍यातील गावागावांत 12 ते 14 हजार जण आले आहेत. ही आकडेवारी तालुका प्रशासनाकडून समजली आहे. या व्यक्तींच्या आरोग्य तपासणीची आकडेवारी उपलब्ध नाही. 

नागरिकांच्या म्हणण्यानुसार स्थलांतरित व्यक्तींनी "होम क्वारंटाईन' होणे आवश्‍यक असताना त्या बाजारपेठेसह अन्यत्र भटकंती करता दिसतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढत आहे. विशेष म्हणजे मुंबई, सुरतसारख्या शहरांतून मोठ्या संख्येने हे नागरिक रायगड जिल्ह्यात येत असल्याने चिंता अधिक आहे असे सांगण्यात येते. 
याबाबत रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी आदिती तटकरे यांच्याकडे गाऱ्हाणे घातले आहे. कोरोनाच्या संकटात रोहा तालुक्‍यात लहान-मोठ्या शहरांतून आलेल्या व्यक्तींची तात्काळ वैद्यकीय तपासणी करून अहवालापर्यंत त्यांचे विलगीकरण करावे, अशी सूचना केली आहे. 

 लॉकडाऊन असताना कोणाही नागरिकाने प्रवास करू नये. अशा नागरिकांसाठी जिल्ह्यात तहसीलदार पातळीवर हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे. गावांमध्ये शाळा, समाजमंदिर अशा ठिकाणी विलगीकरण कक्ष केले आहेत. शहरी भागातून गावाकडे आलेल्या नागरिकांनी तात्काळ स्वतःची माहिती प्रशासनाला कळवावी. स्वतःला विलगीकरण करून घेणे गरजेचे आहे. 
- अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड 

शहरी भागातून रोहा तालुक्‍यात एक हजार 612 नागरिक आले आहेत. त्यांच्या नियमित नोंदी, आरोग्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. गाव पातळीवर आरोग्य सेवक, आशा सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांकडून आढावा घेण्यात येत आहे. त्यांना "होम क्वारंटाईन' करण्यात येत आहे. 144 अनुसार नोटीस बजावली जात आहे. सुमारे 60 नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अन्य ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवले गेलेले आहे. 
- कविता जाधव, तहसीलदार, रोहा 
 


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phone Scam Sangli : फोन आला, वृद्ध घाबरले; सांगलीच्या दोघांना बेकायदेशीर व्यवहाराची भीती घालून ३७ लाखांना लावला चुना

Marathi Movie : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Viral Video : कुत्रा भुंकताच घाबरुन रस्त्यावर पळाला तरुण, समोरुन ट्रक आला अन्..., हृदय पिळवटणारा  व्हिडिओ

Nashik Monsoon : परतीच्या पावसाची आशा: कमी पाऊस झालेल्या तालुक्यांना मिळणार दिलासा?

Rajasthan Anti-conversion Law : धर्म लपवून लग्न करताय? आता धर्मांतरासाठी कडक कायदा; जन्मठेपेसह 50 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT