Dangerous Buildings Sakal
मुंबई

Dangerous Buildings : पेण शहरातील ४२ इमारती धोकादायक

चार-पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पेण - चार-पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पेण शहरातील १३ अति धोकादायक आणि २९ धोकादायक अशा एकूण ४२ इमारतींना रिकाम्या करण्यासंदर्भात नगरपालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.

मात्र, या नोटिसांना रहिवाशांनी केराची टोपली दाखवली आहे. अशा परिस्थितीत जर मुसळधार पावसामुळे एखादी दुर्घटना घडली, तर भयावह परिस्थिती उद्‍भवण्याची शक्यता असल्याची चर्चा होत आहे.

दरवर्षी पावसाळा जवळ आला की, पेण नगरपालिका शहरातील इमारतींचा सर्व्हे करण्यात येतो. यात ज्या इमारती अति धोकादायक किंवा धोकादायक आहेत, त्यामधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा जारी करतात.

एकीकडे पावसाचा जोर वाढत असताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहे. राज्य सरकारने आदेश देऊन अशा ठिकाणी असणाऱ्या वस्त्या आणि धोकादायक इमारती प्रशासनाने रिकामी करून घ्याव्यात. जेणेकरून भर पावसात कोणतीही दुर्घटना घडणार नाहीत. पेण शहरातील १३ अति धोकादायक व २९ धोकादायक अशा एकूण ४२ इमारती धोकादायक असल्याचे नगरपालिकेच्या निदर्शनास आढळून आले.

परिस्थितीचे गांभीर्याने लक्षात घेऊन सर्व इमारतींचे निवासी सदनिकाधारक आणि गाळेधारक मालकांना नोटीस जारी करून इमारतींना धोका असल्याचे सूचित केले आहे. त्यानुसार रहिवाशांनी इमारत रिकामी करावी, अशा नोटिसा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने बजावण्यात आल्या आहेत. मात्र, या नोटिसांना रहिवाशांनी केराची टोपली दाखवली आहे.

या इमारतींना धोका

या वर्षी अति धोकादायक इमारतींमध्ये शहराच्या बाजारपेठेमधील काही, तर शिवाजी चौक, उत्कर्ष नगर, दामगुडे आळी, स्पीड ब्रेकर हॉटेल यासह अन्य इमारतींचा समावेश आहे. तर धोकादायक इमारतींमध्ये गांधी मंदिर समोरील इमारत, लालबहादूर शास्त्री मार्ग, फणस डोंगरी, इस्राईल आळी, रामवाडी, चिंचपाडा या ठिकाणी अनेक इमारती आहेत.

पेण नगरपरिषदेचे नोंदणीकृत स्ट्रक्चरल अभियंत्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार ४२ इमारती अति धोकादायक आणि धोकादायक घोषित केल्या आहेत. त्याप्रमाणे या इमारती, सदनिका व गाळेधारकांना पालिकेकडून नोटिसा दिल्या आहेत. परंतु अत्यंत धोकादायक इमारतींपैकी कोणीही घरे रिकामी केली नाहीत.

या नोटिसींकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हा स्तरावरून आलेल्या आदेशानुसार कायदेशीर बाबींची पूर्तता करून पोलिस बंदोबस्तात या इमारती रिकामी करायला घेऊ. तोपर्यंत जर कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी ही सदनिकाधारकांची राहील.

- जीवन पाटील, मुख्याधिकारी, पेण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT