मुंबई

संकट येण्यापुर्वीच BMC तयार राहणार; मुंबईसाठी जोखिम पूर्वसुचना प्रणाली

समीर सुर्वे


मुंबई : पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी,इमारती यासाठी महानगर पालिका एप्रिल मे महिन्यात नोटीस पाठविण्यास सुरवात करतात. मात्र, आता संपुर्ण मुंबईत "जोखिम पूर्वसुचना आराखडा'तयार केला जात आहे. या आराखड्यानुसार वर्षभर मोहिम राबवून नागरीकांना सुचना करुन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

एप्रिल मे महिन्यात महानगर पालिका धोकादायक इमारती आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकणच्या रहिवाशांना नोटीस पाठवते. अनेक वेळा रहिवाशांकडून घरे रिकामी करण्यास टाळा टाळाही केली जाते. न्यायालयातही अनेक वाद जातात. त्यामुळे आता पावसाळ्यापुर्वी ही मोहिम न राबवता अशा प्रकारची मोहिम राबविण्यात येणार आहे."महापालिका जोखिम पूर्वसुचना आराखडा तयार करत आहे. त्यात जोखमीच्या ठिकाणी राहात असलेल्या नागरीकांना सुरक्षीत स्थळी हलविणे तसेच त्यांना आपत्तीव्यवस्थापानचे प्रशिक्षण देण्याचे काम केले जाईल'. असे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. अग्निशमन दल आणि पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागा मार्फत हे काम सुरु असल्याचेही काकाणी यांनी सांगितले.हा आराखडा तयार झाल्यावर वर्षभर ही मोहिम तसेच जनजागृती करण्यात येणार आहे.

मुंबईच्या पुर्व उपनगराचा मोठा भाग भुकंपच्या दोष रेषेत असल्याने त्या दृष्टीनेही पालिका मायक्रो प्लानिंग करत आहे. यात,शहरांची विभागणी लहान लहान तुकड्यात करुन तेथे उपलब्ध असलेल्या सुविधा आपात्ती आल्यास कोणत्या सुविधा वापरता येतील याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यात स्थानिक आरोग्य व्यवस्था ,अग्निशमन केंद्र,पोलिस ठाणे,मोकळी मैदाने याचे डिजीटल मॅपिंग करण्यात येणार आहे.स्वयंचलित पध्दतीने ही यंत्रणा काम करणार आहे.

नागरीकांना प्रशिक्षण देताना स्थानिक गरज ओळखली जाणार आहे.यात त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आपत्ती येऊ शकते.आपत्तीत कशा प्रकारे स्वत:ला वाचवावे,शक्‍य झाल्यास इतरांना मदत करावी याबाबचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मॅपिंग मध्ये एखाद्या ठिकाणी आगीच्या घटना जास्त घडत असतील तर त्या दृष्टीने नागरीकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.तर,दक्षिण मुंबईत खासकरुन जुन्या चाळी इमारती पडण्याचा धोका असतो.तर,तेथील नागरीकांना त्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.असेही सांगण्यात आले.

-----------------------------------------

city marathi news BMC will be ready before the crisis comes Risk early warning system for Mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT