Lalbaugcha Raja Esakal
मुंबई

Lalbaugcha Raja 2023: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी; कार्यकर्ते-भाविक आपापसांत भिडले.

Shocking viral video on social media| गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याचे दिसून आले

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यभरात गणेशोत्सवाची अगदी आनंदात आणि उत्साहात सुरू आहे. अशातच मुंबईतील नवसाला पावणारा गणराया म्हणून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्याच्या काना-कोपऱ्यातून भाविक येत आहेत. अशातच लालबागच्या राजाच्या मंडपात तुफान गर्दी झाली आहे. त्यावेळी गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याचे दिसून आले आहे.(Latest Marathi News)

दर्शनासाठी रांगेत असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहून अनेकजण संताप व्यक्त करीत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण केली असल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान, मंडपात मोठा गोंधळ देखील निर्माण झाल्याचं दिसून आले.

याआधी दोन दिवसांपूर्वी लालबाग राजाच्या मंडपातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भक्तांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचं दिसून येत होतं. यामध्ये महिला आणि लहान मुले देखील गर्दीत असल्याचे दिसून येत आहे. (Marathi Tajya Batmya)

नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. दर्शनासाठी मोठी गर्दी होते. गणरायाच्या मंडपात सुरक्षेसाठी पोलीस आणि कार्यकर्ते तैनात असतात. पण गर्दी वाढल्यानंतर गर्दी नियंत्रित करणे केवळ अशक्य होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT