मुंबई

ठाण्यात मनसैनिक आणि पोलिसात जोरदार राडा; आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

तुषार सोनवणे

मुंबई - राज्यातील नागरिकांना आलेल्या वाढीव वीजबिलांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन पुकारले आहे. ठाण्यातही जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. परंतु मोर्चा सुरू होताच पोलिस आणि मनसैनिकांमध्ये झटापटी झाली. 

राज्यातील नागरिक कोरोना काळात आर्थिक तंगीत असताना वाढीव वीजबिलांमुळे त्यांच्यावरील ताण वाढला आहे. राज्य सरकारने आधी या बिलांमध्ये सवलत देण्यात येईल असे म्हटले होते. परंतु त्यानंतर महावितरणाने सवलत नाकारल्या नंतर नागरीकांमध्ये संतापाची लाट आहे. याबाबत मनसेने जोरदार आंदोलन पुकारले आहे, मुंबई, ठाणे, पुणे सह राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. ठाण्यात कॅडबरी जंक्शन - नौपाडापासून अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.  पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. म्हणून मनसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापटी झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसात जोरदार राडा पाहायला मिळाला.

आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली. अविनाश जाधव, रविंद्र जाधव आणि अभिजित पानसे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यासोबत मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. 'सरकार आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्यांना वीजबिलांतून सवलत मिळायलाच हवी. सरकारचा आम्ही निषेध करतो', असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT