मुंबई

जोगेश्वरीत राडा, शिवसेना-मनसे कार्यकर्ते भिडले

आणखी तीव्र पडसाद उमटू शकतात.

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी (Clashes shivsena mns) झाली आहे. जोगेश्वरी पूर्वेला (jogeshwari area) नालेसफाईच्या मुद्यावरुन दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते परस्परांना भिडले. शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये विविध विषयांवरुन शाब्दीक वाद रंगतच असतो. पण आता विषय थेट हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर या घटनेचे पुढच्या काही दिवसात आणखी तीव्र पडसाद उमटू शकतात. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाचे असे प्रकार वाढू शकतात. (Clashes between shivsena & mns activist at jogeshwari area )

नालेसफाई हा मुंबई महापालिकेच्या अख्त्यारितील विषय आहे. जागेश्वरी पूर्वेला झालेल्या या हाणामारीत मनसे उपाध्यक्ष प्रविण मर्गज यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. जागेश्वरी पूर्वेचे प्रभाग क्रमांक ७३ चे नगरसेवत प्रविण शिंदे यांच्या घरा जवळून वाहणाऱ्या नाल्याच्या सफाईचे काम सुरु होते.

त्याचवेळी मनसे उपाध्यक्ष प्रविण मर्गज आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले. त्यांनी कंत्राटदाराला नालेसफाईबद्दल काही प्रश्न विचारले. त्याचवेळी शिवसेना नगरसेवक प्रविण शिंदेही आपल्या कार्यकर्त्यांसोबत तिथे पोहोचले व दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये आधी शाब्दीक बाचाबाची सुरु झाली.

काही वेळातच या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. हाणामारीत प्रविण मर्गज यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. हा वाद आणखी चिघळू नये, यासाठी या भागात मेघवाडी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT